Ahmedabad Airplane Crash x
देश विदेश

Ahmedabad Airplane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कसा झाला? कारण आले समोर

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटना होण्यापूर्वी एअर इंडियाचे विमान पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद असा प्रवास करुन परतले होते. या प्रवासादरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नव्हती अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

Saam Tv

Airplane Crash : १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगितली. एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन उड्डाण केले होते. उड्डाणानंतर ६५०-७०० फूट उंचीवर विमान गेले आणि त्यानंतर हे प्रवासी विमान नागरी वस्तीवर कोसळले.

नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत अपघाताबाबत माहिती दिली. उड्डाणानंतर विमानाची खाली कोसळले. दुपारी १.३९ वाजता पायलटने एटीसीला मे डे कॉल पाठवला होता. एका मिनिटातच विमान मेघानीनगरमधील मेडिकल हॉस्टिलच्या परिसरात कोसळले. अपघातापूर्वी विमानाने पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद असा प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची तांत्रिक समस्या झाली नव्हती.

केंद्र सरकारने एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सचिवांच्या पातळीवरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अपघाताची कारणे तपासणे, एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेणे आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना सुचवणे अशी कामे समितीद्वारे केली जातील.

एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांची चौकशी सुरु आहे. भारतात एकूण ३४ ड्रीमलाइनर आहेत. त्यातील आठ विमानांची चौकशी पूर्ण झाली आहे. अपघातग्रस्त विमानामध्ये २४२ लोक होते. त्यातील २४१ जणांचा मृत्यू झाला तर एका प्रवशाला जीवनदान मिळाले. विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले तेथील २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

Banana And Health : केळीच्या पानांचे, सालीचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

Manoj Jarange Patil: कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा

GST Reforms: विम्यावरील जीएसटी रद्द, प्रिमियम होणार स्वस्त, तुमचे पैसे किती वाचणार?

SCROLL FOR NEXT