Air Plane Plane Crash Prediction Tweet x
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : 7 दिवसांपूर्वी विमान अपघाताचे भाकीत केलं होतं, महिला जोतिषाचार्याचं 'ते' ट्वीट व्हायरल

Air Plane Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर एका महिला जोतिषाचार्याने केलेल्या ट्वीटची चर्चा पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

अहमदाबादच्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या विमान दुर्घटनेत अनेकजणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण अजूनही यासंबंधित अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एपी या वृत्तसंस्थेने विमानातील २४२ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. लंडनच्या दिशेने उड्डाण केलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या विमानाचे टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच अपघात झाला.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक जुनी भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. एक्स या सोशल मीडिया साइंटवर Astro Sharmistha’ नावाच्या हँडलवरून २९ डिसेंबर २०२४ रोजी भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यामध्ये भारताच्या हवाई विभागात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ही पोस्ट पुन्हा ५ जून २०२५ रोजी पुन्हा शेअर केली होती. तेव्हा आजही विमान अपघाताची शक्यता वर्तवण्यात आली होती.

५ जूननंतर अवघ्या सात दिवसांनी एअर इंडिया विमानाचा अपघात झाला. '२०२५ मध्ये विमान वाहतूक क्षेत्रात सुधारणा होईल. पण त्याचवेळी काही भीषण अपघात घडतील' असे अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाने म्हटले होते. गुरु ग्रह मृग शिरा आणि अर्द्रा नक्षत्रांच्या मिथुन राशीत ६.५ अंश वेगाने भ्रमण करत असताना विमान वाहतूक वाढेल, पण सुरक्षेसंबंधित तडजोड होईल असे तिने भाकित केले होते.

५ जूनच्या पोस्टमध्ये काय म्हटले होते?

टाटा हैदराबादमध्ये राफेल विमानाचे फ्यूजलेज बनवले जातील. येत्या दोन वर्षांत इस्रो अवकाश आणि उपग्रह अभियांत्रिकी, अंतराळ पर्यटनात जगाला आश्चर्यचकित करेल. गेल्या वर्षी नक्षत्र संक्रमणाद्वारे हे भाकीत केले होते. २०२५ मध्ये विमान अपघात आणि विमान वाहतुकीत विनाश होण्याची शक्यता आहे, असे अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर पर्यटक अडकले; पर्यटकांच्या सुटकेचा थरारक रेस्क्यू, पाहा,VIDEO

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

SCROLL FOR NEXT