Air India Plane Crash : माझ्या अंतरात्म्यानं सांगितलं की जाऊ नको... जे विमान कोसळलं, त्याचं तिकीट केलं कॅन्सल; प्रवाशानं मानले देवाचे आभार

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादच्या मेघानी नगर येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. या विमानाचे तिकीट एका व्यक्तीने आयत्या वेळी कॅन्सल केले. यामुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले.
Air India Plane Crash
Air India Plane Crashx
Published On

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानाने टेकऑफ केले, ७०० फूटावर गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये विमान खाली कोसळले. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात विमान कोसळले. अपघात झाल्यानंतर लगेचच पोलीस, आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचले.

अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानात सावजीभाई टिंबडिया नावाचे प्रवासी लंडनला जात होते. पण काही कारणांमुळे त्यांनी प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. 'माझा मुलगा लंडनमध्ये राहतो. मी त्याला भेटायला निघालो होतो. पण आजचा दिवस मला आवडला नाही म्हणून मी तिकीट कॅन्सल केले आणि पुढच्या सोमवारचे तिकीट बुक केले', अशी माहिती सावजीभाईंनी माध्यमांना दिली.

Air India Plane Crash
Air India Plane Crash : हॉस्टेलमध्ये ५० ते ६० इंटर्न डॉक्टर; कोसळलेलं विमान बिल्डिंगच्या आरपार घुसलं, आणखी एक भयंकर व्हिडिओ

'मला तीन-चार दिवसांनी जायचे आहे. मी सोमवारच्या फ्लाइटचे तिकीट बुक केले आहे. आज जाणाऱ्या विमानाचे तिकीट देखील माझ्याकडे होचे. पण आज मला जावेसे वाटत नव्हते. आतून आवाज आला की आज जाऊ नको. मला वाटले आजचा दिवस चांगला नाही. म्हणून मी आज विमानाने प्रवास न करण्याचा निर्णय घेतला, माझा सीट नंबर ए१ होता', अशी वक्तव्य सावजीभाई टिंबडिया यांनी केले.

Air India Plane Crash
Ahmedabad Plane Crash : १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश प्रवासी अन..; अहमदाबाद विमान दुर्घटनेतील विमानात कोणकोण होतं? संपूर्ण माहिती समोर

सावजी टिंबडिया म्हणाले, 'मला कळले आजच्या ज्या विमानाचे तिकीट माझ्याकडे होते, त्या विमानाचा अपघात झाला. मी एकटाच लंडनला जाणार होता. मला स्वामी नारायणाने वाचवले आहे. मी भगवान स्वामी नारायणाचा भक्त आहे. मी दररोज मंदिरात जातो. त्यांच्यामुळे माझे प्राण वाचले, मी आता पुढच्या सोमवारी मुलाकडे जाईन.'

Air India Plane Crash
Plane Crash Video : इमारतीवर पडलं अन् आरपार घुसलं, अहमदाबाद विमान अपघाताचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com