Plane Crash Video : इमारतीवर पडलं अन् आरपार घुसलं, अहमदाबाद विमान अपघाताचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या विमान अपघाताचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crashx
Published On

Air India Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. टेक ऑफ घेतल्यानंतर काही सेकंदांमध्ये विमान कोसळले. या विमानामध्ये दोन पायलट, १० केबिन क्रू आणि प्रवासी असे २४२ जण असल्याची माहिती समोर आली आहे. टेक ऑफनंतर ७०० फुटाहून विमान खाली कोसळले. या विमान अपघाताचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Ahmedabad Plane Crash
Air Indian Plane Crash : २४२ प्रवासी, लंडनची प्लाइट आणि १.२० मिनिटाला अपघात... अहमदाबाद विमान दुर्घटनेची लेटेस्ट अपडेट

एअर इंडियाचे बी ७८७ विमान व्ही टी एएनबी उड्डाण क्रमांक एआय १७१ साठी उड्डाण केल्यानंतर लगेच खाली कोसळले. विमान खाली कोसळल्यानंतर त्याला आग लागली असे म्हटले जात आहेत. अपघातामुळे सर्वत्र धुर पाहायला मिळाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक, अग्निशमन दल आणि आरोग्य पथके घटनास्थळी दाखल झाली. लगेचच घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली.

Ahmedabad Plane Crash
Plane Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळलं, नेमकं काय झालं? VIDEO

अपघातानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक विमान इमारतीच्या आरपार घुसले असल्याचे पाहायला मिळते. विमान पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हे एअर इंडियाचे एआय १७१ विमान असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण याची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन विमानाचा उड्डाण घेतले होते. टेक ऑफ घेतल्यानंतर थोड्या वेळात मेघानीनगर परिसरात विमान कोसळले. मेघानी नगरमधील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर विमान कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. अपघातात १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ahmedabad Plane Crash
Air India Plane Crash: अहमदाबादमधील विमान अपघाताचा दुसरा VIDEO; धुरानं काळवंडलेला परिसर आणि सांगाडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com