
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. टेक ऑफ दरम्यान हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. अपघातादरम्यान विमानात २४२ जण होते.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१२ जून) दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनी नगर परिसरात विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी दिली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
- एआय १७१ क्रमांकाच्या विमानाचे उड्डाण दुपारी १.१७ वाजता झाले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते.
- दुपारी १.२० च्या दरम्यान मेघनी नगर परिसरातील हॉस्पिटल कॅम्पसजवळ विमान कोसळले.
- टेक ऑफ करताना विमान कोसळले. अपघाताच्या वेळी त्यात २४२ जण होते, यामध्ये क्रू मेंबर्स, पायलट आणि प्रवासी यांचा समावेश होता.
- विमान अपघातात मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- विमानाचा मागील भाग झाडाला धडकल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
- अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान क्रमांक एआय १७१ आज १२ जून २०२५ रोजी कोसळले. या संदर्भात तपशील आम्ही तपासत आहोत, अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.
- दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मेहनी नगरच्या आसपासचे रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.