Air India
Air IndiaSaam

Air India: अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल; २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान आगीत भस्मसात

Air India Plane crash: अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरात Air India विमानाचा धक्कादायक अपघात घडला; टेकऑफनंतर काही क्षणांतच विमान कोसळलं. याचा व्हिडिओ आता सोशस मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानीनगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे. टेकऑफनंतर काही क्षणात विमान जवळच्या परिसरात कोसळलं. यानंतर विमानामधून धूराचे लोट पाहायला मिळाले. अपघातानंतर परिसरात जोरात स्फोट झाल्याची माहिती आहे. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मेघानीनगर परिसरातून एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणार होते.विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर काही सेकंदात खाली कोसळले. क्षणात विमान आगीत भस्मासात झाले. विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर काही क्षणात तीन अग्रिशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. विमान अपघातानंतर परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहे. विमानाचे प्रचंड नुकसान झाले असून, प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधिकृत माहिती अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Air India
Politics: अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; बुलढाण्यातील महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करीत असल्याची माहिती आहे. विमान अपघातात मृतांची आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघाताच्या कारणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com