Politics: अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; बुलढाण्यातील महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Congress Workers Join NCP: खामगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा राजकीय झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.
congress
congressSaam
Published On

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेता आता मैदानात उतरला आहे. पक्षांतर्गत मोर्चेबांधणी, सभा, बैठका आणि नव्या चेहऱ्यांचा पक्षप्रवेश अशा हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी एक मोठी धक्का देणारी घटना आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये घडली आहे.

बुलढाण्यातील काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. तसेच अजित पवार गट अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे.

या कार्यक्रमादरम्यान अजित पवार खामगाव येथे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजित पवार नेत्यांना तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहे.

congress
Raja Raghuvanshi: 'राजा जवळ आलेला मला आवडत नाही', हनिमूनदरम्यान सोनमचा बॉयफ्रेंड राजला मेसेज, चॅट्स समोर...

अजित पवारांच्या उपस्थितीत आज खामगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे अजित पवार गट अधिक बळकट होणार असून, या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

तसेच, अजित पवार आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अकोल्यातील पोलीस परेड ग्राउंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी ते अकोला आणि वाशिम जिल्ह्यांची आढावा बैठक घेणार असून, अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

congress
Shocking: 'त्याने माझा वापर करून सोडलं', बड्या खासदारावर उच्चशिक्षित महिलेचा गंभीर आरोप; पोस्ट करत पत्ते उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com