
गुजरातमधील अहमदाबाद येथे आज (१२ जून) दुपारी एक भीषण विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. हे विमान अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत होते. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, या विमानात एकूण २४२ जण होते. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि त्यांचे कुटुंबीय देखील प्रवास करत होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानात १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश प्रवासी, ७ पोर्तग्रीज प्रवासी आणि १ कॅनेडियन प्रवासी होते. याशिवाय विमानात १० कॅबिन क्रूसह २ पायलट देखील होते. विमानाने विमानतळावरुन उड्डाण घेतले. ७०० फुटाहून ते खाली कोसळले. अपघातानंतर तात्काळ बचावकार्याला सुरुवात झाली. घटनास्थळी अग्निशमन आणि आरोग्य पथके दाखल झाली.
घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून अहमदाबाद विमानतळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत विमानतळावरील सर्व उड्डाणे आणि आगमन सेवा थांबवण्यात आल्या आहेत. ज्या परिसरात ही विमान दुर्घटना घडली आहे, त्या मेघानी नगरमधील वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने थांबवण्यात आली आहे.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे विमान मेघानीनगर येथील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. या भीषण अपघातात १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.