villagers complain about company for polluting pavana river saam tv
मुंबई/पुणे

Maval News : केमिकल मिश्रित पाण्यामुळे पवना नदी प्रदूषित? युवक काॅंग्रेसचा आंदाेलनाचा इशारा

कंपनीचे प्रदूषित पाणी पवना नदीत सोडत असल्याने वेळोवेळी ग्रामस्थांनी सांगून सुद्धा पाण्याची योग्य सोय केलेली नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दिलीप कांबळे

Pavana River Pollution Issue :

मावळातून जाणाऱ्या पवना नदीमध्ये (pavana river) गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा परिणाम येथील नागरिक जनावरे आणि शेतीवर होत आहे. (Maharashtra News)

मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने आतापर्यंत अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे देखील नुकसान झाले आहे. घराघरात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गेली 35 वर्षांपासून बेबड ओहळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी पवना नदीत सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदूषण कमी न केल्यास संबंधित कंपनी बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कंपनी प्रशासनाला निवेदन देखील युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. कंपनीचे प्रदूषित पाणी पवना नदीत सोडत असल्याने वेळोवेळी ग्रामस्थांनी सांगून सुद्धा पाण्याची योग्य सोय केलेली नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कंपनीचे दूषित पाणी नदीत जाऊन मिसळत असल्याने तेच पाणी गाव, शेती, जनावरे अनेकांच्या वापरात येते. त्यामुळे रोगराई आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. नुकसानीचे व पर्यावरणाला हानिकारक देखील ठरत आहे असे शेतक-यांनी नमूद केले.

युवक काॅंग्रेसचा कंपनीला टाळ ठाेकण्याचा इशारा

दरम्यान लवकरात लवकर कंपनीने पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती ग्रामस्थांकडून कंपनीला करण्यात आली आहे. मात्र कंपनीच्या दूषित पाण्याची योग्य ती सोय लवकरात लवकर केली गेली नाही तर कंपनीला टाळ लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा (youth congress) राजेश वाघोले (अध्यक्ष, युवक काँग्रेस) यांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुषित पाणी नदीत साेडले जात नाही : कंपनीचे स्पष्टीकरण

कंपनी प्रशासनाने पाण्याची टाकी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा नदीत झाला असून सर्व पाणी हे स्वच्छ होते. या फुटलेल्या टाकीचे काम सुरू असल्याचे संबंधित कंपन्याच्या अधिकारी यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. कंपनीचे कोणतेही दुषित पाणी नदीत सोडले जात नसल्याचे सांगत कंपनीवरील आरोप अधिका-यांनी फेटाळले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT