Satara : सातारा जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपासून राजधानी महा संस्कृती महोत्सवाची मेजवानी, जाणून घ्या कार्यक्रम

राजधानी महा संस्कृती महोत्सवाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य आहे.
rajdhani maha sanskriti mahotsav 2024 in satara
rajdhani maha sanskriti mahotsav 2024 in satarasaam tv
Published On

Satara News :

सातारा जिल्ह्यात येत्या 8 फेब्रुवारीपासून ते 11 फेब्रुवारीपर्यंत राजधानी महा संस्कृती महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. या महाेत्सवात रविवारी साताऱ्यात जाणता राजा महानाट्यामधील रोमहर्षक शिवराज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रम देखील हाेणार आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांना विनामूल्य पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (satara collector jitendra dudi) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेवर या तालुक्यांच्या ठिकाणी सांस्कृतीक कार्यविभाग, सांस्कृतीक संचालनालय व सातारा जिल्हा प्रशासन यांच्यावतीने राजधानी महा संसकृतीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील विविध संसकृतींचे अदानप्रदान, स्थानिक कलाकरांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चालेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात, अज्ञात लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महा संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

सातारा जिलह्यातही पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या मार्गदर्शनाखाली राजधानी महा संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

rajdhani maha sanskriti mahotsav 2024 in satara
Kolhapur : वस्ताद बाळ गायकवाड यांचे निधन, मल्ल हळहळले

असे आहेत कार्यक्रम

8 फेब्रुवारी सातारा येथे सायंकाळी 6 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू कला मंदिर येथे कलर्स ऑफ इंडिया कार्यक्रम.

11 फेब्रुवारी सातारा येथे सकाळी 9 वाजता गांधी मैदान (राजवाडा) ते शिवतीर्थ (पाेवई नाका) शोभा यात्रा

8 ते 10 फेब्रुवारी सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन. सातारा येथील श्रीमंत छत्रपती शाहू कलामंदिर येथे बचत गट प्रदर्शन.

8 फेब्रुवारी फलटण येथे महाराजा मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता शिवव्याख्यान व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा.

8 फेब्रुवारी कराड येथील टाऊन हॉल येथे सायंकाळी 5 वाजता जागर लोककेलचा कार्यक्रमाबरोबर विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक प्रवेश सादरीकरण.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

9 फेब्रुवारी वाई येथील सत्यवती जोशी सभागृह येथे लेणं देशभक्तीचं कार्यक्रम. विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धा.

10 फेब्रुवारी पूनम चौक महाबळेश्वर येथे सायंकाळी 5 वाजता फ्लैश मॉब व मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक.

राजधानी गौरव सोहळा

11 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता राजधानी गौरव सोहळ्याचे आयोजन. या सोहळ्यात मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता गायकवाड, जुईली जोगळेकर, ह्यषीकेश जोशी, भारत गणेशपुरे, रोहित राऊत, रसिका सुनील, रसिका सुनील, सागर कारंडे, नमिता पाटील यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे हाेईल.

त्याचबरोबर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिभेतून आणि लेखणीतून साकार झालेल्या महानाट्यामधील रोमहर्षक शिवराज्याभिषेक सोहळा साकारण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

rajdhani maha sanskriti mahotsav 2024 in satara
Valentine Day निमित्त मावळातून तीस लाख गुलाब जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, शेतकऱ्यांची लगबग सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com