Maratha Reservation : ओबीसी आरक्षणास किंचितही धक्का लागणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट : उदय सामंत

Sanjay Gaikwad Statement : छगन भुजबळ यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा करतील असे मंत्री उदयन सामंत यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
maratha reservation new gr will not affect obc says uday samant
maratha reservation new gr will not affect obc says uday samantSaam Tv
Published On

Beed News :

मराठा आरक्षणाचा जो मसुदा तयार केला आहे त्यामूळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. ही सरकारची भूमिका आहे असे मत उद्याेग मंत्री उदय सामंत (uday samant latest marathi news) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. ते बीडमध्ये बोलत होते. (Maharashtra News)

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश (maratha reservation gr) रद्द करा अशी मागणी सकल ओबीसी समाज (obc samaj) करु लागला आहे. गुरुवारी राज्यभर सकल ओबीसी समाजाने आंदाेलन करीत स्थानिक प्रशासनास अध्यादेश रद्द करण्याच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

maratha reservation new gr will not affect obc says uday samant
Agriculture News : हळद तेजीत, कापसाच्या दरात घसरण

याबाबत उद्याेग मंत्री उदय सामंत म्हणाले राजकारणाच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही वाद वाढवायचा नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही. ओबीसी आरक्षणास किंचितही धक्का लागणार नाही, ही भूमिका सरकारची आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळांशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चर्चा करतील

आमदार संजय गायकावड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर मंत्री सामंत म्हणाले भुजबळ हे मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या पक्षाच्या आमदारांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. ही पक्षाची भूमिका नाही. छगन भुजबळ यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा करतील असे यावेळी सामंत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

maratha reservation new gr will not affect obc says uday samant
Success Story : बिलाेलीमधील शेतकऱ्याने एक एकरातील मिरची पिकातून कमावले लाख रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com