वरंधा घाटात चार ते पाच ठिकाणी दरड कोसळली
वरंधा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली
दोन्ही बाजूंनी रस्ता बंद झाल्यामुळे अनेक वाहने अडकली
एकाच ठिकाणी अडकल्यामुळे प्रवासी हैराण झाले
भोर -महाड मार्गावरील वरंधा घाटात दरडी कोसाळण्याचे सत्र काही केल्या थांबेना. शुक्रवारी आणि रविवारी पडलेल्या दरडींनंतर पुन्हा रात्री भोर हद्दीतील वारवंड ते उंबर्डे दरम्यानच्या रस्त्यावर चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी रात्री दरडी कोसळल्या आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रात्रीपासून वरंधा घाट वाहतुकीस पुन्हा पुर्णतः बंद झाला आहे.
दरम्यान, दोन्ही बाजूचा रस्ता बंद झाल्याने प्रवास करणारी काही वाहने व प्रवाशी अडकले आहेत. शासनाकडून दरडी हटवण्याचे काम सुरु असले तरी दरडीचे प्रमाण पाहता दरडी हवण्यास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे भोर महाड मार्गावरुन वरंधा घाटातून प्रवास टाळण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
वारवंड ते उंबर्डे दरम्यान पडलेल्या दोन दरडी मधील अंतरात यामार्गावरुन प्रवास करणारी मोटारी व मालवाहतूक वाहने अडकलेली आहेत. रस्ता दोन्ही बाजूंना पडलेल्या दरडींमुळे ठप्प झाला आहे. तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अडकलेल्या वाहनांना दोन्ही बाजूने जाता येत नसल्याने अडकून पडली आहेत. प्रवाशांना मात्र आसपास कोणतीही सोय नसल्याने दरड हाटवेपर्यंत तेथेच ताटकळत बसावे लागणार आहे.
उंबर्डे फाट्याजवळील असणाऱ्या हॉटेल येथे २७ गाड्या रात्रीपासून अडकल्या आहेत. येथील हॉटेल ही बंद असल्यामुळे जवळपास ७० ते ८० लोक रात्रीपासून या बिना अन्नपाण्याची रखडली आहेत. घाट बंद झाल्यामुळे अनेक वाहनं अडकून पडली आहेत. एकाच ठिकाणी बराच काळ वाहनं थांबल्याप्रमाणे प्रवासी प्रचंड हैराण झाले आहेत.
तर दुसरीकडे, ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी परिसरात रस्ता खचल्याची घटना घडल्याने पुणे -कोलाड मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील माहिती पोलिस, पत्रकार आणि सोशल मीडिया माध्यमांतून प्रसारित करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.