Manasvi Choudhary
पावसाळ्यात गरमागरम चहा किंवा सूपसोबत काहीतरी कुरकुरीत खायचं असेल तर तुम्ही क्रिस्पी ओनियन रिंग्स ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.
ओनियन रिंग्स घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी बनवू शकता.
क्रिस्पी ओनियन रिंग्स बनवण्यासाठी कांदे, मैदा, कॉर्न फ्लोअर, ब्रेड क्रम्स, लाल मसाला, काळी मिरी पावडर, चाट मसाला, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
कांद्याची साल काढून गोलाकार कापा. नंतर या गोल कापलेल्या काद्यांचे एक एक रिंग्स वेगळे करा.
एका भांड्यात मैदामध्ये कांद्याचे रिंग्स मिक्स करून बाजूला ठेवा. म्हणजे मिश्रण कांद्याला व्यवस्थित लागेल.
पुन्हा एका भांड्यात मैदा, कॉर्न फ्लोअर, लाल मसाला, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि ओरेगॅनो एकत्र करा. आता त्यात थोडे थोडे थंड पाणी घालून मिश्रण तयार करा.
एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स काढून घ्या. नंतर त्यात मैद्यात मिक्स केलेले कांद्याचे रिंग मिक्स करा.नंतर हे मिश्रण ब्रेड क्रम्सच्या मिक्स करून ठेवा.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलात ब्रेड क्रम्स लावलेले ओनियन रिंग्स चांगले फ्राय करा.