पावसाळ्यात पारंपारिक पद्धतीची अळुच्या देठांची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

अळूची भाजी

पावसाळ्याला सुरूवात झाली की अळूची भाजी घरोघरी बनवली जाते. अनेकजण ही भाजी आवर्जून खातात. पावसाळ्यात अळूच्या भाजीचे अनेक प्रकार बनवले जाते.

Alu Leaves

प्रसिद्ध पदार्थ

अळूवडी, अळूचे फदफद, अळूची रस्सा भाजी सर्वांनीच खाल्ली असेल तर तुम्ही आता अळूच्या देठांची भाजी बनवा.

Alu Recipe | Google

अळूच्या देठांची भाजी

अळूच्या देठांची भाजी बनवण्यासाठी रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.

alu stem curry

पारंपारिक रेसिपी

पारंपारिक पद्धतीच्या अळूच्या भाजीमध्ये हरभरा डाळ किंवा शेंगदाण्याचा कूट देखील तुम्ही वापरू शकता.

alu stem curry

साहित्य

अळूच्या देठांची भाजी बनवण्यासाठी अळूची कोवळी देठे, चिंचेचा कोळ, गूळ, भिजवलेली चणा डाळ किंवा शेंगदाणे, मोहरी, हिंग, हळद, तिखट आणि मीठ हे साहित्य घ्या.

alu stem curry

अळूच्या देठांवरील पातळ साल काढा

सर्वात आधी अळूच्या देठांवरील पातळ साल काढून घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा. हे तुकडे पाण्यात थोडे मीठ आणि चिंच टाकून उकळून घ्या

alu stem curry

भाजीला फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, हिंग आणि हळद याची फोडणी द्या. नंतर त्यात उकडलेली देठे, भिजवलेली चणा डाळ, मसाा, मीठ, गूळ आणि चिंचेचा कोळ घालून भाजी चांगली परतून घ्या.

alu stem curry

भाजी तयार होईल

साधारण ५ ते ७ मिनिटे ही भाजी चांगली शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी पारंपारिक पद्धतीची अळूच्या देठांची भाजी तयार होईल.

alu stem curry

NEXT: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त|Ashadhi Ekadashi

येथे क्लिक करा..