Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government: 'देवेंद्र फडणवीस मुख्य न्यायमूर्ती नाहीत, काहीही निर्णय घेतला तरी हे सरकार जाणार', संजय राऊतांचा पुन्हा दावा

Priya More

Sanjay Raut Press Conference: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Deputy CM Devendra Fadnavis) जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा केला आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत हा दावा केला आहे. 'देवेंद्र फडणवीस मुख्य न्यायमूर्ती नाहीत, अध्यक्ष नाहीत. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. काहीही निर्णय घेतला तरी हे सरकार जाणार', असल्याचे मत संजय राऊतांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी सरकार पडणार असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयने काय म्हटलं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस काय अध्यक्ष आहेत का? सूर्य मावाळणार आहे. काहीही निर्णय घेतला तरी हे सरकार जाणार आहे. हे सरकार 10 ऑगस्टपर्यंत जाईल.', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

तसंच, 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हे मुख्य न्यायमूर्ती नाहीत. फडणवीसांच्या बोलण्याला काही अर्थ आणि तथ्य नाही. ३ महिने पूर्ण होत आहे त्यामुळे निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यांनी काहीही निर्णय घेतला हा शिंदे सरकारच्या विरोधातच जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची या वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग उद्या आणि दुसरा भाग २७ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी सांगितले की, 'उद्या मुलाखत येईल त्यापूर्वीच टीका करायला लागले. टीका करायला काही उद्योग नाही का? निधी वाटप सुरू आहे. त्यावर बोला. मुलाखत घेण्याआधीच त्याची चर्चा सुरु होते. उद्याच्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट होतील.'

संसदेच्या पावसाळी अधिवशेनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नसल्यामुळे संजय राऊतांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'चर्चा करायला जोड्याने या. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सोबत यावे. ते आम्हाला चालेल. पण पंतप्रधान यांनीच बोलावं ही आमची मागणी आजही कायम आहे. मनमोहन सिंह यांना मौनीबाबा म्हणून बोलत होते. आता मात्र हे मौन धरून बसले आहेत.', अशी टीका त्यांनी केली.

यावेळी संजय राऊत यांनी असे देखील सांगितले की, 'काल परवा अण्णा हजारे यावर बोलले. अण्णांनी पंतप्रधान यांना विचारायला हवं. हवं तर अण्णा यांनी मणिपूरला जावं. आम्ही त्यांच्यासोबत मणिपूरला जाऊ.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT