Ajit Pawar News: मुख्यमंत्रिपदाची भविष्यवाणी अंगलट! अजित पवारांकडून समर्थक नेत्यांची खरडपट्टी, सूत्रांची माहिती

Ajit Pawar Latest News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
Ajit Pawar Latest News
Ajit Pawar Latest Newssaam tv

Ajit Pawar Latest News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यातच अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अमोल मिटकरींनी केलेलं ट्वीट चांगलंच व्हायरल झालं होतं. अजित पवार (Ajit Pawar) हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा दावा मिटकरी यांनी केला होता.

त्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर्स सुद्धा झळकले होते. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करणाऱ्यांची खरडपट्टी केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Ajit Pawar Latest News
Maharashtra Assembly Monsoon Session: प्रशांत बंब यांना ७४२ कोटी; तर जयंत पाटील, रोहित पवारांवरही निधीचा वर्षाव; कुणाला किती मिळाला निधी? यादी आली समोर...

मुख्यमंत्रीपद बदलावरून वक्तव्य करणाऱ्या समर्थक आमदार तसेच मंत्र्यांना अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोरच झापलं असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची अजित पवारांनी चांगलीच खरपट्टी काढल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार युती सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री होताच शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या बातम्या समोर आल्या.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांचे समर्थक आमदार आणि विरोधीपक्षातील नेत्यांनी केला. या दाव्यांमुळे शिंदे गटातील आमदार तसेच मंत्री नाराज झाले.

Ajit Pawar Latest News
PM Krishi Bima Yojana: प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढवावी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

अखेर सरकारमध्ये सहभागी (Maharashtra Politics) असताना अशा प्रकारची संभ्रम व्यक्त करणारी वक्तव्ये आल्याने अजित पवारांनी आपल्या गटातील नेत्यांची चांगलीच खरपट्टी काढल्याची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री राहणार असून मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.

फडणवीसांच्या स्पष्टीकरणामुळे मुख्यमंत्री बदलला जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याची पूर्णपणे स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com