PM Krishi Bima Yojana: प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढवावी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

Sudhir Mungantiwar Latest News: प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढवावी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी
Sudhir Mungantiwar on PM Krishi Bima Yojana
Sudhir Mungantiwar on PM Krishi Bima Yojanasaam tv
Published On

Sudhir Mungantiwar on PM Krishi Bima Yojana: प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढवावी, अशी मागणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे.

आपल्या पत्रात ते म्हणाले आहेत की, ''चंद्रपूरसह राज्यात विविध भागात झालेल्या आणि अजूनही काही भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढवावी.''

Sudhir Mungantiwar on PM Krishi Bima Yojana
Maharashtra Assembly Monsoon Session: प्रशांत बंब यांना ७४२ कोटी; तर जयंत पाटील, रोहित पवारांवरही निधीचा वर्षाव; कुणाला किती मिळाला निधी? यादी आली समोर...

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इंटरनेट, दूरध्वनी सेवा, वीजपुरवठाही अतिवृष्टी आणि पुरामुळे खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या विहित मुदतीत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी करता येणे शक्य होणार नाही.  (Latest Marathi News)

केवळ चंद्रपुरातच नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने, केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मंत्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी खात्यास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Sudhir Mungantiwar on PM Krishi Bima Yojana
Amit Shah on Manipur: 'मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यास सरकार तयार', लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य...

शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या सुरक्षा कवचावर अवलंबून असतो. या योजनेची व्यापकता आणि लेकप्रियता लक्षात घेता केंद्राने राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर योग्य तो निर्णय तातडीने घेण्याची विनंती मंत्री मुनगंटीवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com