Amit Shah on Manipur: 'मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यास सरकार तयार', लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य...

Lok Sabha Monsoon Session 2023: 'मणिपूरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यास सरकार तयार', लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य...
Amit Shah on Manipur
Amit Shah on ManipurSaam Tv
Published On

Lok Sabha Monsoon Session 2023: मणिपूरमधील एक व्हायरल व्हिडीओ समोर आल्यानंतर अवघ्या देशात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. सुप्रीम कोर्टानेही मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. अशातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून यात विरोधक मणिपूर हिंसाचारावर चार चर्चेची मागणी केली होती.

यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितले की, सरकार या अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक तयार का नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीदरम्यान, गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "विरोधकांना विनंती आहे की चर्चा होऊ द्या आणि सत्य बाहेर येऊ द्या.''

Amit Shah on Manipur
Nitin Gadkari News: 'एक-एक किलो मटण घरोघरी पोहोचवलं, तरीही आम्ही निवडणूक हरलो...', गडकरींनी सांगितला तो किस्सा...

मणिपूरच्या मुद्द्यावर तीन वेळा लोकसभा तहकूब केल्यानंतर दुपारी 2.30 वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. मी सभागृहात चर्चेसाठी तयार आहे. विरोधक संसदेत चर्चा का होऊ देत नाहीत, हे मला कळत नाही.  (Latest Marathi News)

शाह यांच्या या अभिभाषणानंतरही लोकसभेतील विरोधी सदस्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची मागणी करत आपला विरोध सुरूच ठेवल्याने सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

Amit Shah on Manipur
Maharashtra Landslide News: दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणार राज्य सरकार, प्रस्ताव सादर करण्याचे अधिकाऱ्यांना देण्यात आले आदेश

संसदेतील गोंधळाबाबत राजनाथ सिंह यांनी खरगे यांच्याशी फोनवर केली चर्चा

दरम्यान, संरक्षण मंत्री आणि लोकसभेतील उपनेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर चर्चा करून मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेतील गदारोळ संपविण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, संरक्षणमंत्र्यांनी रविवारी रात्री काँग्रेस अध्यक्षांना फोन केला होता. मात्र विरोधकांना सभागृहात मणिपूरच्या मुद्द्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर सविस्तर चर्चा हवी असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com