Nitin Gadkari News: 'एक-एक किलो मटण घरोघरी पोहोचवलं, तरीही आम्ही निवडणूक हरलो...', गडकरींनी सांगितला तो किस्सा...

Nitin Gadkari Latest News: 'एक-एक किलो मटण घरोघरी पोहोचवलं, तरीही आम्ही निवडणूक हरलो...', गडकरींनी सांगितला तो किस्सा...
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Tv
Published On

Nitin Gadkari Latest News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा त्यांची स्वत:चाच निवडणुकीचा किस्सा सांगताना एक-एक किलो मटण वाटूनही निवडणूक कशी हरली हे सांगितले. मतदार खूप हुशार आहेत, प्रत्येकाचा माल खातात आणि ज्याला मत द्यायचे त्यालाच मत देतात, असे ते म्हणाले आहे.

Nitin Gadkari
Help from govt to Flood Affected People : पूरग्रस्तांना तातडीने १० हजारांची मदत दिली जाणार, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, लोक निवडणुकीत पोस्टर लावून, मतदारांना खाऊ घालून विजयी होतात. पण माझा त्यावर विश्वास नाही. (Latest Marathi News)

ते म्हणाले, मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मी सर्व प्रयत्न केले आहेत. मी एकदा एक प्रयोग केला आणि प्रत्येकी एक किलो सावजी मटण घरोघरी पोहोचवले. पण आम्ही निवडणूक हरलो.

Nitin Gadkari
Harshwardhan Jadhav HeartAttack News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

गडकरी म्हणाले, जनता खूप हुशार आहे. लोक म्हणतात, जे दिले जाते ते घ्या. पण मते ज्यांना द्यायची आहेत, त्यांनाच दिली जातात. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करता, तेव्हाच त्यांचा तुमच्यावर विश्वास बसतो आणि त्यासाठी कोणत्याही पोस्टर बॅनरची गरज नसते. अशा मतदाराला कोणत्याही लोभाची गरज नाही, कारण त्याचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो दीर्घकालीन आहे, अल्पकालीन नाही.

गडकरी म्हणाले, होर्डिंग लावून किंवा मटण पार्टी देऊन कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही. जनतेचा विश्वास आणि प्रेम निर्माण करा. निवडणुकीच्या वेळी प्रलोभने दाखवण्यापेक्षा लोकांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com