Amit Thackeray Toll Break Case: राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी सिन्नर येथील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी मनसेसैनिक आणि टोल कर्मचारी यांच्या झालेल्या वादानंतर संतप्त मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला.
या घटनेनंतर आता राजकारण रंगलं आहे. भाजपने एक व्हिडिओ पोस्ट करून अमित ठाकरे यांना तोडायला नाही तर बांधायला शिका असा सल्ला दिला आहे. त्यानंतर मनसेकडूनही भाजपला खरमरीत उत्तर देण्यात आलं आहे.
भाजपच्या ट्वीटर हँडलवरून अमित ठाकरे यांना, टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा' असा सल्ला देत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला.
या व्हिडिओ म्हटलंय की, राज ठाकरे आणि टोल नाका यांचं तसं जुनं आणि घट्ट नातं आहे. हे संपूर्णमहाराष्ट्राला चांगलाच ठाऊक आहे. त्यात खुद्द राज ठाकरे यांच्या सुपुत्राची म्हणजे अमित ठाकरेंची गाडी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नरच्या टोल नाक्यावर तब्बल तीन ते साडेतीन मिनिटे थांबवली. त्या टोलनाक्यावर फास्टटॅग संबंधित काहीतरी तांत्रिक अडचण होती, म्हणून गाड्या थांबवण्यात येत होत्या. त्यामुळे अमित ठाकरेंची गाडीही थांबवली.
"आता अमित ठाकरेंची गाडी थांबवली म्हटल्यावर मनसेचे कार्यकर्ते भलतेच भडकले आणि त्यांनी थेट टोल नाक्याचीच तोडफोड केली. यासंबंधी जेव्हा अमित ठाकरेंना समजलं तेव्हा त्यांना त्यांच्या चेहरयावरचा असुरी आनंद लपवता आला नाही. माध्यमांशी बोलताना तर त्यांनी खोटं विधानही केलं की त्यांना कर्मचाऱ्यांनी टोल नाक्यावर १० मिनिटं थांबलं. पण अमित साहेब तीन साडेतीन मिनिटं थांबवण्याला तुम्ही १० थांबवलं सांगून तुम्ही तुमच्या कार्यकर्यांना हे करण्यास भाग पाडलं आणि टोलनाका फोडायला सांगितला. (Tajya Marathi Batmya)
स्वत:चं कर्तव्य बजावत विचारपूस करणं ही त्या टोलनाका कर्मचाऱ्यांची चूक नक्कीच नव्हती. पण तुमच्या मनसे कार्यकर्त्यांचा आततायीपणा त्यांनाच भोवला. लक्षात ठेवा हे सरकार जनसामान्यांचं सरकार आहे. कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी मुलांसाठी वेगळे नियम पाळले जाणार नाही. तसं केलं तर महाराष्ट्राच्या जनतेची आणि प्रामाणिकपणे टोल भरणाऱ्या प्रत्येकाची प्रतारणा होईल. ते आम्हाला मान्य नाही. म्हणूनच तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने अटक केलं. जेव्हा अमित ठाकरेंना या प्रकरणावर अमित ठाकरेंना विचारलं तेव्हा त्यांनी साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे त्यात एकाची भर पडली, असं म्हटलं. अमित ठाकरे तुमची ही दादागिरी चालू देणार नाही". (Latest Political News)
भाजपाच्या ट्वीटला मनसेकडून उत्तर
भाजपने सोशल मीडियालर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला मनसेकडून खरमरीत उत्तर देण्यात आलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या व्हिडिओला उत्तर देत म्हटले की, मणिपूरच्या घटनेवर थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपाला मुजोर टोल कंत्राटदारांची दलालली करायची आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.