गिरीश कांबळे
Monsoon session News: विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व कामकाजांवर सध्या नागरिकांच लक्ष आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. अशात आज होण्याऱ्या अधिवेशनाच्या सत्रात कोणते पुढील मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)
विधानसभा कामकाज
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) काही दिवसांपूर्वी विदर्भ ट्रॅव्हल्स अपघात झाला आणि त्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप चौकशी समिती नेमण्यात न आल्याने आज यावर विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत. सामान्य नागरिकांच्या खिशाला यामुळे फटका बसतोय. टोमॅटोचा प्रश्न गंभीर असताना नाशिक जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेली फसवणूक यावर तारांकित प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.
विधान परिषद कामकाज
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहित शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यात प्रचंड प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. नुकतेच शिक्षण विभागातील एका बड्या महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 23 शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीची मागणी आज विरोधी पक्षाकडून लावून धरली जाईण्याची शक्यता आहे.
मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी तेराशे कोटी रुपये खर्च करून ही सौंदर्यकरण पूर्ण झालेलं नाहीत. या व्यतिरिक्त आणखी एक हजार कोटी देखील विविध कामांसाठी मिठी नदीसाठी खर्च करण्यात आले आहेत. परंतु नदीच्या पुनर्जीवितेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या विषयावरून सत्ताधारी पक्षाकडून मागील काळात मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असणाऱ्या ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.