Deputy CM Ajit Pawar: राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांचा २२ जुलै म्हणजेच उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. यापैकी काही बॅनर्सवर अजित पावर हे भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर देखील हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते संजय राऊतत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवारच भावी मुख्यमंत्री, शिंदे गटानं (Shinde Group) सत्य स्वीकारावं', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मी खात्रीने सांगतो की अजित पवार हे भावी मुख्यमंत्री आहेतच आणि लवकरच मुख्यमंत्री देखील होतील. भावी म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहितेय. काय घडामोडी घडत आहेत तेही माहिती आहे. मग त्या कायदेशीर घडामोडी असतील किंवा राजकीय असतील.'
'अजित पवारांचे भविष्य लवकर- लवकर जवळ येतंय. त्यामुळे अजित पवार हे भविष्यात मुख्यमंत्री होतील यात काही शंका नाही. महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळेल. त्यांच्या वाढदिवसाला असे बॅनर लागले असतील तर हे सत्य शिंदे गटाने लवकर स्वीकारलं पाहिजे.' असे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे देखील स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.
यावेळी संजय राऊत यांनी मणिपूरच्या घटनेवरुन मोदी सरकारवर देखील हल्लाबोल केला.'तुम्ही भ्रष्टाचारावर चर्चा करू शकत नाही. तुम्ही मणिपूरवर चर्चा करायला तयार नाहीत. मग संसद कशाला पाहिजे. मग तुम्ही पंतप्रधान कसले आहात. संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात हे लक्षात घ्या. मणिपूरचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. मणिपूरच्या विषयांवर यूरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. पण मणिपूरच्या विषयावर आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे.', असं संजय राऊत यांनी सांगितले.
तसंच, 'पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो. ते कोणत्याही स्वार्थाशिवाय काहीही करत नाहीत. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल.', अशी शब्दात त्यांनी पीएम मोदींवर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.