Sanjay Raut On PM Modi: 'पंतप्रधानांच्या कृतीमागे राजकीय स्वार्थ, स्वार्थाशिवाय ते काहीच करत नाही', मणिपूरच्या घटनेवरुन संजय राऊतांचे टिकास्त्र

Manipur Viral Video: मणिपूरच्या घटनेवरुन संजय राऊत यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे.
Sanjay Raut And Narendra Modi
Sanjay Raut And Narendra ModiSaam TV
Published On

Mumbai News: मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार आणि दोन महिलांना निवस्त्र करुन फिरवल्याच्या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Manipur Viral Video) झाल्यानंतर सर्व देशवासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी देखील या घटनेवरुन मोदी सरकारला धारेवर धरले आहे. अशामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Thackeray Group Leader Sanjay Raut) यांनी देखील या घटनेवरुन मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. 'पंतप्रधानांच्या कृतीमागे राजकीय स्वार्थ, स्वार्थाशिवाय ते काहीच करत नाही', अशी टीका त्यांनी केली आहे.

Sanjay Raut And Narendra Modi
Pulses-Wheat Rate: महागाईने पिचलेल्या जनतेसाठी गुड न्यूज! डाळ आणि गव्हाच्या किंमती कमी होणार? केंद्र सरकारचा प्लान काय?

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'हा विषय काही नवीन नाही. या देशांमध्ये एका जमातीच्या दोन मुलींना निवस्त्र फिरवले जाते. प्रधानमंत्री जवळजवळ 56 दिवसानंतर यावर वक्तव्य देतात. ते सुद्धा संसदेच्या बाहेर. याचा अर्थ तुम्ही संसदेला मानत नाही. नवीन संसद कशासाठी उभी केली आहे. लोकशाहीचा डंका कशासाठी आहे?' असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच, 'पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो. ते कोणत्याही स्वार्थाशिवाय काहीही करत नाहीत. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल.', अशी शब्दात त्यांनी पीएम मोदींवर टीका केली आहे.

Sanjay Raut And Narendra Modi
High Court Decision: पत्नी भाड्यानं घेतलेली मालमत्ता किंवा बांधिल मजूर नाही; हायकोर्टाचं स्पष्ट मत

'तुम्ही भ्रष्टाचारावर चर्चा करू शकत नाही. तुम्ही मणिपूरवर चर्चा करायला तयार नाहीत. मग संसद कशाला पाहिजे. मग तुम्ही पंतप्रधान कसले आहात. संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात हे लक्षात घ्या. मणिपूरचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. मणिपूरच्या विषयांवर यूरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. पण मणिपूरच्या विषयावर आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे.', असं संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut And Narendra Modi
Guinness World Record Of Crying: ऐकावे ते नवलच! विश्व विक्रमासाठी पठ्ठ्या ७ दिवस रडला; काही वेळासाठी डोळ्यांची दृष्टीही गमावली

संजय राऊतांनी पुढे सांगितले की, '70 दिवस होत आले यांना मणिपूर अजून शांत करता येत नाही आणि तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवायच्या गोष्टी करत आहात. स्वत:ला विश्वगुरू म्हणवता. मणिपूर हा देखील या देशाचा भाग आहे. मणिपूर या देशाचे नागरिक आहेत. मणिपूरच्या महिलांना देशात रस्त्यावर आणून नग्न करून मारलं जातं. मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून मारलं जातंय. ही देशातील 140 कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणता ना? मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com