मुंबई : ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ हा एकाचवेळी २१ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घडवणारा सोहळा यंदा ८ व ९ मार्च रोजी मुंबईत होणार आहे. वरळीतील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’च्या डोम मध्ये हा भक्तीचा महाकुंभ होणार आहे. भारताला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभलं आहे. संतांनी आणि सद्गुरूंनी परंपरेचा जागर करत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखवलाय. सुदृढ, आरोग्यदायी आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीची वाट आपल्याला दाखवली आहे. अध्यात्मिक मार्गावर चालण्याचा निर्धार करतानाच गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ सोहळ्याचे आयोजन केलं आहे. प्रवेश सगळ्यांसाठी मोफत आहे मात्र नावनोंदणी आवश्यक करणे अनिवार्य आहे.
एकमेवाद्वितीय आणि पवित्र सोहळ्यात ‘एपी ग्लोबले’ तर्फे आध्यात्मिक प्रगती आणि सांस्कृतिक समृद्धी साठीच्या ‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’ ची घोषणा होणार आहे. उत्सवात आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन, भजन, कीर्तन, रिंगण सोहळा, नामस्मरण, ओंकार जप आदी कार्यक्रमही होणार आहेत. पादुका दर्शन उत्सव प्रवेश मोफत असेल मात्र नावनोंदणी आवश्यक. तारीख ८ आणि ९ मार्च रोजी सकाळी १० ते रात्रौ ९ पर्यंत एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे भाविक दर्शन घेऊ शकतात.
अभिजित पवार, अध्यक्ष, एपी ग्लोबले यांनी सांगितले,‘‘या कार्यक्रमातून भाविकांना एकाचवेळी पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याचा अपूर्व योग उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रत्येकाला अमर्याद आध्यात्मिक शक्ती आणि एकत्रित भक्तीचे बळ देणारा आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाददादा पै उपस्थित राहणार आहेत. रविवारी ९ मार्च रोजी आध्यात्मिक मार्गदर्शक, वक्ते, लेखक, शिक्षणतज्ज्ञ व श्री एम सत्संग फाऊंडेशनचे प्रमुख पद्मभूषण श्री एम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी- संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत नामदेव, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज, संत सावता माळी, संत एकनाथ, संत तुकाराम, संत निळोबाराय, श्री महेश्वरनाथ बाबाजी, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज (शेगाव), समर्थ रामदास स्वामी, टेंब्ये स्वामी महाराज, गोंदवलेकर महाराज, शंकर महाराज, गुळवणी महाराज, गजानन महाराज (शिवपुरी), श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.