Guru Paduka Darshan: श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव; भाविकांच्या गर्दीने फुलणार 'भक्तीचा महाकुंभ'

Guru Paduka Darshan Mahakumbh Of Bhakti : या महोत्सवात २१ श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची संधी पाहिल्यांदाच मुंबईकरांना मिळणार आहे. या सोहळ्यात वारकरी टाळ-मृदंगासह सहभागी होणार आहेत.
Guru Paduka Darshan
Guru Paduka Darshan Mahakumbh Of BhaktiSaam tv
Published On

सकाळ माध्यम समुहाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या नोंदणीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसात मिळतोय. पादुका दर्शन उत्सव ८ आणि ९ मार्चला वरळी येथील एनएससीआयच्या डोम येथे 'भक्तीचा महाकुंभ' होणार आहे. या उत्सवासासाठी नोंदणी केली जात असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या उत्सवात २१ श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची संधी पाहिल्यांदाच मुंबईकरांना मिळणार आहे. या सोहळ्यात वारकरी टाळ-मृदंगासह सहभागी होणार आहेत. विविध भजनी मंडळे, देवस्थाने , विविध संस्थांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींसह उद्योगसंस्था, विविध कार्यालयातील कर्मचारी , ज्येष्ठ नागरिकांसह तरुणही या सोहळ्यात सहभागी होतील.

या उत्सव सोहळ्यातील भक्ती शक्ती व्यासपीठाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत होईल. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ९ वाजता आध्यात्मिक गुरू पद्मभूषण श्री. एम यांचे व्याख्यान होणार आहे. या भक्तीच्या महाकुंभात पोहोचवण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) , या जवळच्या रेल्वे स्टेशन आहेत.

Guru Paduka Darshan
Shukraditya Yoga: 12 दिवसांनंतर शुक्रादित्य राजयोग करणार मालामाल; 'या' 3 राशींचा वेगाने वाढणार बँक बॅलन्स

तसेच कार्यक्रमस्थळा शेजारी नेहरू तारांगण हे बेस्टचे बसस्थानक आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी कोणतेच शुल्क नाहीये. ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांना क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतरच भाविकांना आपला प्रवेश निश्चित केला जाणार आहे.

Guru Paduka Darshan
Zodiac Signs: सावधान, सावधान! 'या' पाच राशींपासून राहा दोन हात दूर, हुशारीसह असतात कपटी

महोत्सवात संत आणि गुरूंच्या पादुका असणार

ज्ञानेश्वर महाराज

संत मुक्ताई

नामदेव महाराज

संत जनाबाई

नरहरी सोनार

सेना महाराज

सावता माळी

एकनाथ महाराज

तुकाराम महाराज

संत निळोबाराय

श्री महेश्वरनाथ बाबाजी

श्री स्वामी समर्थ

श्री साईबाबा

श्री गजानन महाराज

समर्थ रामदास स्वामी

टेंबे स्वामी महाराज

गोंदवलेकर महाराज

शंकर महाराज

गुळवणी महाराज

सदगुरू गजानन महाराज

श्रीगुरू बालाजी तांबे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com