
बृहत पाराशर होरा शास्त्रामध्ये अशा अनेक राशींचा उल्लेख करण्यात आलाय. ज्या अतिशय हुशार आहेत. यासोबतच छुप्या पद्धतीने नियोजन करण्यातही ते माहीर असतात, हे लोक वाईट असतात असं नाही पण यांच्यापासून दोन हात लांब राहणं चांगलं असतं. हे लोक मित्र म्हणून खूप चांगले असतात. परंतु जेव्हा ते शत्रुत्व निभावतात तर ते टोकाचं शत्रुत्व निभावत असतात.
इतर ज्योतिष ग्रंथानुसार, या राशी अशा असतात, ज्या खूप स्वार्थी असतात. हे लोक आधी स्वतःचा विचार करतात. यासोबतच काही राशी आहेत ज्यांचे लोक स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करायला नेहमी तयार असतात. या कारणामुळे अशा राशीच्या लोकांपासून अंतर राखणे चांगले असते. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत ज्यापासून आपल्याला दोन हात दूर राहायचे आहे.
मिथुन राशीचे लोक मानसिकदृष्ट्या कुशाग्र आणि बोलके मानले जातात. हे लोक त्यांच्या फायद्यानुसार स्वतःला बदलतात. यासोबतच ते गोड आणि चतुराईने कोणाचेही मन वळवू शकतात. हे लोक आपल्या बुद्धिमत्तेने आणि शब्दांनी लोकांकडून कामे करून घेतात.
हे लोक अतिशय मुत्सद्दी असतात. आपण त्यांच्याबद्दल सत्य जाणून घेऊ शकत नाहीत. त्यांच्या शब्दांत सहज प्रभावित करण्याची क्षमता असते. त्यामुळे या राशीच्या लोकांशी आपण प्रत्येक परिस्थितीत समतोल राखा पाहिजे. ते स्वतःला फायदा बघत असतात. हे लोक सभ्य पण मुत्सद्दी असतात.
या राशीचे लोक गुप्तपणे नियोजन करण्यात निपुण असतात. जेव्हा ते तुम्हाला फसवतात तेव्हा तुम्हाला त्यांची युक्ती समजते. कोणत्याही भावना आणि परिस्थितीचा वापर त्यांच्या बाजूने कसा करायचा हे त्यांना चांगले ठाऊक असते. या राशीच्या बहुतेक लोकांवर अचानक हल्ला होणारी राशी मानली जाते. त्यामुळे या राशींपासून दोन हात लांब राहिलं पाहिजे.
मकर राशीचे लोक खूप व्यावहारिक आणि तार्किक असतात. या लोकांना जेथे आपला फायदा दिसतो हे तिकडे निघून जात असतात. हे लोक स्वतःची रणनीती बनवून शांतपणे त्यावर काम करण्यावर विश्वास ठेवतात. अतिशय संयमी असण्याबरोबरच हे लोक संधीसाधूही असतात. त्यामुळे यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे.
कुंभ राशीच्या लोकांची विचारसरणी खूप वेगळी असते. प्रत्येक गोष्ट नव्या दृष्टीकोनातून पाहण्यात हे तज्ञ असतात. ते लोकांची मने वाचून त्यांना त्यांच्या युक्तीत अडकवू शकतात. कोणत्याही परिस्थितीला आपापल्या परीने वळवण्यात ते तज्ञ आहेत. या राशीच्या लोकांची विचारसरणी असामान्य मानली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.