Zodiac Personality Traits: 'या' ५ राशींच्या लोकांचा नका करू नाद; शत्रुत्व घेणं पडेल महागात!

Zodiac Personality Traits: ज्योतिषशास्त्रात १२ राशींचा उल्लेख आहे, यापैकी काही राशींचे जातक शत्रुत्व निभावण्यात खूप माहीर असतात. शत्रुत्व घेणं अनेकांना महागात पडतं.
Zodiac Personality
Zodiac Personality TraitsSaam Tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीची स्वतःची विशिष्ट गुणवत्ता असते. काही राशींच्या लोकांचा स्वभाव खूप साधा आणि शांत असतो. तर काही राशीच्या लोकांचा स्वभाव खूप आक्रमक असतो. ज्योतिषशास्त्रातही अशा काही राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या खूप जहाल स्वभावाच्या असतात. त्यांच्याशी शत्रुत्व घेणं खूप घातक ठरते. या राशीच्या लोकांशी शत्रुत्व केल्यास खूप नुकसान सहन करावे लागू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये त्या राशीचे गुण नक्कीच असतात. यासोबतच या राशीच्या लोकांवर त्या राशीच्या अधिपती ग्रहाचा प्रभावही दिसून येतो. कुंडलीचे पहिले घर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे असते. अशा स्थितीत जी राशी पहिल्या घरात आहे. हे त्या व्यक्तीचा आक्रमकतेचं चिन्ह असते आणि त्याचा स्वभाव त्या चिन्हानुसार असतो.

Zodiac Personality
Zodiac Sign Traits: 'या'4 राशीचे लोक वयानुसार होतात अधिक सुंदर अन् आत्मविश्वासू

मेष

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे त्यांचा स्वभावही आक्रमक आहे. त्यांची राशी अग्नी तत्वाची असल्यामुळे ते आपल्या रागावर लवकर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. या कारणामुळे मेष राशीच्या लोकांशी नेहमी वाद घालणे टाळावे.

सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तर सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. या कारणामुळे सिंह राशीचे लोक कधीही नतमस्तक होण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांचे कोणाशी वैर असेल तर ते त्या व्यक्तीचा पूर्ण बदला घेतात. त्यांच्याशी वाद घालण्यापूर्वी १० वेळा विचार केला पाहिजे.

वृश्चिक

या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि वृश्चिक राशीच्या लोकांवरही राहूचा प्रभाव असतो. या कारणामुळे जर कोणी त्यांचा विश्वासघात करतो किंवा त्यांच्याशी शत्रुत्व घेतात ते त्याला कधीही माफ करत नाहीत. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा हे लोक त्याला नक्कीच शिक्षा करतात. यामुळे या लोकांशी शत्रुत्व करणे खूप धोकादायक मानले जाते.

Zodiac Personality
Horoscope: 'या' 5 राशींना आनंद गगनात मावेना; मंगळवार आहे खास, नाती सुधारतील, जुडतील मनं

मकर

मकर राशीचा स्वामी शनि आहे. ते खूप मेहनती आणि जबाबदार आहेत. ते यशासाठी कठोर परिश्रम करतात. त्यांच्या मार्गात कोणी आले किंवा त्यांना त्रास दिला तर हे लोक शत्रुत्व राखण्यात पटाईत असतात.

कुंभ

शनिदेव हा कुंभ राशीचाही स्वामी आहे. या कारणामुळे कुंभ राशीच्या लोकांशी कधीही पंगा घेऊ नये. हे लोक समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांचे कोणाशी शत्रुत्व असेल तर ते ते कधीही विसरत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com