नवी मुंबईमध्ये शिवसेना- भाजप युती तुटली
नवी मुंबईत शिवसेना–भाजप आमने-सामने
शिंदे गटाचा ‘एकला चलो’चा निर्णय
संभाजीनगरमध्येही महायुतीला तडा
संजय शिरसाट यांचा भाजपवर गंभीर आरोप
महापालिका निवडणुकच्या रणधुमाळीत राजकीय वर्तुळातून एकापोठापाठ एक घडामोडी घडत आहेत. अनेक महानगर पालिकांमध्ये शिवसेना- भाजप युतीमध्ये फूट पडली. त्यापाठोपाठ आता नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये शिवसेना- भाजपची युती तुटली. या ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकला चलोचा नारा दिला असून ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आमने-सामने आल्यामुळे याठिकाणचे राजकीय समिकरण देखील बदलण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना-भाजप युतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला जुळला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपच्या गणेश नाईक विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगणार आहे.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर युती तुटली. भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, 'संभाजीनगरमध्ये युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला. स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या. स्थानिक कार्यकर्ते एक वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले. शंका अगोदर आली होती. मी दरवेळेस स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या. बावनकुळे यांच्याबरोबर देखील बैठक झाली. शेवटच्या संपर्कात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बोलणे झाले. त्यांच्यासमोर जागा वाटप ठरले. त्यावेळी युती झाली या संभ्रमात होतो.'
भाजपच्या हट्टीपणापायी युती तुटल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. ते म्हणाले की, 'मात्र ज्यावेळी जागा द्यायची तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव दिला. आमचे कार्यकर्ते नाराज होतील अशी त्यांची भूमिका होती आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा असल्याचे सांगितले. या घडीला सुद्धा कोणताही नवीन प्रस्ताव दिला नाही. आग्रही भूमिकेला तडा दिला. आमची ताकद वाढली आम्ही काहीही करू शकतो असा त्यांना अहंकार होता त्याचा अंत आज भाजप- शिवसेना युती तोडल्याने झाला.भाजपच्या हट्टापायी युती तुटली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्यानंतर देखील स्थानिक नेत्यांनी खेळविण्याचा प्रयत्न केला. अंधारात ठेवून मुलाखती घेतल्या. आमची धावपळ होईल असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते. त्यांनी विश्वासघात केला आणि युती तोडली.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.