High Speed Train: ७६७ किमी फक्त साडेतीन तासात, नवी मुंबई विमानतळापासून जाणार हाय स्पीड ट्रेन, वाचा सविस्तर

Mumbai Hyderabd High Speed Train: नवी मुंबई एअरपोर्टवरुन तुम्ही थेट हैदराबाद गाठू शकणार आहे. मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प या भागातून जाण्याची शक्यता आहे.
High Speed Train
High Speed TrainSaam Tv
Published On
Summary

नवी मुंबईवरुन थेट हैदराबाद गाठता येणार

हाय स्पीड ट्रेन प्रकल्प नवी मुंबईवरुन जाण्याची शक्यता

मुंबई ते हैदराबाद अवघ्या ३.३० तासात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरु झाले आहे. या विमानतळावरुन आता प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. दरम्यान, या विमानतळावरुन आता हेदराबादवरुन मुंबईला जाणारी हायस्पीड ट्रेन जोडली जाणार आहे.केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली असल्याचे समजत आहे. केंद्र सरकारच्या या हायस्पीड ट्रेनसाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

High Speed Train
Pune Airport News : आनंदाची बातमी! पुण्यातून विमानाने काही तासांत अबू धाबीला जाता येणार, जाणून घ्या वेळापत्रक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलमार्ग जोडले जाणार आहेत. यापैकी अनेक कामे वेगात सुरु आहेत. नवीन वर्षात अनेक मार्गांचे काम पूर्ण होणार आहे. यापैकी मेट्रो ८ चे काम लवकरच पूर्ण होईल. यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास खूप सुसाट होणार आहे. मुंबई विमानतळावरुन थेट नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार आहे. हा मेट्रो मार्ग अर्ध भुयारी असणार आहे.

नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलमार्ग जोडले जाणार आहेत. यापैकी अनेक कामे वेगात सुरु आहेत. नवीन वर्षात अनेक मार्गांचे काम पूर्ण होणार आहे. यापैकी मेट्रो ८ चे काम लवकरच पूर्ण होईल. यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास खूप सुसाट होणार आहे. मुंबई विमानतळावरुन थेट नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार आहे. हा मेट्रो मार्ग अर्ध भुयारी असणार आहे.

नवी मुंबईवरुन थेट हैदराबाद गाठता येणार (Navi Mumbai To Hyderabd High Speed Train)

नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी औद्योगिक वाणिज्य विकास होत आहेत. त्यामुळे हैदराबादवरुन नवी मुंबई एअरपोर्टला पोहचण्यासाठी हायस्पीड ट्रेनचा नवी प्रकल्प प्रस्तावित केला आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार आहे. आता या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी प्रलंबित आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबादमुळे दक्षिणेतील राज्ये जोडली जाणार आहे. हा प्रवास काही मिनिटांवर येणार आहे.

High Speed Train
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरूवारपासून सेवेत, बंगळूरूहून येणार पहिलं विमान, वाचा सविस्तर

हायस्पीड रेल्वे (High Speed Train)

मुंबई हैदराबाद हे अंतर ७६७ मीटर आहे. सध्या हा रेल्वे प्रवास १४ आणि १ तासांचा आहे.या प्रकल्पामुळे ३.३० ते ४.३० तासात तुम्ही हे अंतर पार करु शकतात. या रेल्वे मार्गात १० ते ११ स्थानके असण्याची शक्यता आहे.

High Speed Train
Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com