Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरूवारपासून सेवेत, बंगळूरूहून येणार पहिलं विमान, वाचा सविस्तर

Navi Mumbai International Airport inauguration date : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून सेवेत येणार आहे. बंगळूरूहून येणारे इंडिगोचे पहिले व्यावसायिक विमान ऐतिहासिक लँडिंग करणार आहे.
Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International Airportsaam tv
Published On

Navi Mumbai International Airport to Begin Operations from Thursday : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सेवेत येणार आहे. 25 डिसेंबरला म्हणजे नाताळच्या मुहूर्तावर नवी मुंबई विमानतळावरून आकाशात पहिले प्रवासी विमान झेपावणार आहे. देशातील अत्याधुनिक हरितपट्टा म्हणजेच ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून विकसित झालेल्या या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. (Navi Mumbai International Airport Goes Live on Christmas, Indigo Flight from Bengaluru to Make History)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण लवकरच अनुभवायला मिळणार आहे. बंगळूरूहून येणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार आहे. यामुळे विमानतळ प्रत्यक्ष कार्यान्वयनाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार आहे. इंडिगो एअरलाइन्सचे हे विमान बंगळूरूहून उड्डाण करून नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. या ऐतिहासिक उड्डाणासाठी सर्व तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून, चाचणी उड्डाण यशस्वी ठरल्यानंतर नियमित विमान सेवांचा मार्ग मोकळा होणार आहे.

Navi Mumbai International Airport
Konkan politics : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष झाले, निकालाच्या तिसऱ्या दिवशी थेट शिंदेंच्या भेटीला, कोकणात धमाका होणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक सुविधा मिळणार असून, नवी मुंबई, रायगड तसेच संपूर्ण कोकण पट्ट्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Navi Mumbai International Airport
Mahapalika Election : एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे ४ वाजेपर्यंत बैठक, राज्यातील जागावाटपावर शिक्कामोर्तब?

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्षात कार्यान्वित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले असून, नवी मुंबईकरांसाठी हा क्षण निश्चितच अभिमानाचा ठरणार आहे.

Navi Mumbai International Airport
Mahapalika Election : ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याआधीच बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा, २ दिवसात जागावाटप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com