Konkan politics : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष झाले, निकालाच्या तिसऱ्या दिवशी थेट शिंदेंच्या भेटीला, कोकणात धमाका होणार

Kankavli municipal election : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर कोकणातील राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Konkan politics
Shiv Sena leader likely to join Shinde factionKonkan politics
Published On

विनायक वंजारी, साम टीव्ही प्रतिनिधी

Shiv Sena leader likely to join Shinde faction : कोकणात पुन्हा एकदा मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत कणकवलीचे नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांचा विजय झाला. शहर विकास आघाडीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण ते ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. पण निवडून आल्यानंतर पारकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर कोकणातील राजकारणाला वेगळं वळण लागल्याचे बोलले जातेय. पारकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. निकालाच्या तिसऱ्याच दिवशी पारकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीमुळे पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलेय.

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मंगळवारी रात्री शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदेंनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे अभिनंदन केले. त्याशिवाय पारकर यांना शिंदेंनी निधी कमी पडू देणार नाही, असे अश्वासनही दिले. उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार राजन तेली या भेटीवेळी उपस्थित होते. त्यामुळेच पारकरांच्या या भेटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का? अशा चर्चांना कणकवीलत उधाण आले आहे.

Konkan politics
Mahapalika Election : ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याआधीच बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा, २ दिवसात जागावाटप

कणकवलीचे नवे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. संदेश पारकर हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. नुकतेच कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शिंदेची शिवसेना आि ठाकरेंची शिवसेना कणकवलीत भाजपच्या विरोधात एकत्र आली होती.

Konkan politics
BMC Election : मनसेसोबतच्या युतीच्या घोषणेआधी ठाकरेंना जोरदार धक्का, शिवसेनेच्या बड्या नेत्याने साथ सोडली

नितेश राणेंच्या होमपीचवर कट्टर विरोधक असलेल्या संदेश पारकर यांचा मोठा विजय झाला होता. कणकवलीतील विजयानंतर संदेश पारकर यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली. या भेटीवेळी आमदार निलेश राणेंची मात्र अनुपस्थिति होती. पारकर, शिंदे आणि सामंत यांच्यामध्ये जवळपास ४० मिनिटे बैठक झाली. सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच निवडणुकीनंतर संदेश पारकर धनुष्यबाण हाती घेणार असल्याची सिंधुदुर्गात चर्चा सुरू झाली आहे.याबाबत अद्याप पारकर यांनी अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही.

Konkan politics
Pune Elections : काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यातील नेत्याने ४० वर्षांची साथ सोडली, हातात घड्याळ बांधलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com