

Ghatkopar leader Dr Archana Bhalerao BJP entry : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई अन् सात महापालिकेसाठी युती करणार आहेत. याबाबत आज अधिकृत घोषणा होणार आहे. पण त्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने धक्का दिलाय. मुंबईतील घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरेंना बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय. घाटकोपरमध्ये भालेराव यांची ताकद आहे. याचा निवडणुकीत फटका बसू शकतो, असे म्हटले जातेय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६, घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या डॉ. अर्चना संजय भालेराव यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मान. अमीत साटम यांच्या उपस्थितीत २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडला. या पक्ष प्रवेशाच्या वेळी मनोज कोटक, आमदार राम कदम, मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, श्वेता परुळकर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमीत साटम म्हणाले, "आता मुंबईमध्ये पूर्वीची शिवसेना राहिली नाही. त्यांनी आता हिंदुत्व पूर्णतः सोडून दिलेलं आहे. यांचा रंग बदलला आहे. आता भगवा यांचा रंग राहिलेला नाही. त्याची नीती बदलली आहे आणि आता त्यांना मुंबईला पाकिस्तान करायचं आहे. मुंबईमध्ये महापौर यांना खान करायचा आहे. त्यामुळे या सगळ्याला कंटाळून यांचे शिवसैनिक त्यांची साथ सोडून मुंबईच्या विकासाला साथ देताना दिसत आहेत."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.