Zilla Parishad Elections : जिल्हा परिषदेचा धुरळा याच आठवड्यात, संकेत मिळाले, संभाव्य तारीख समोर

Zilla Parishad Panchayat Samiti election date updates Maharashtra : राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ४ ते ८ दिवसांत निवडणूक जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत.
Zilla Parishad Election date update:
State Election Commission announces municipal election dates; political focus shifts to Zilla Parishad pollssaam tv
Published On

Zilla Parishads Panchayat Samiti Election Date Updates : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय. मुंबई-पुण्यासह २९ महापालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. पण जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखेबाबतची अपडेट समोर आली आहे. महायुतीमधील माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आठवडाभरात निवडणुका जाहीर होतील,असा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे झेडपीच्या निवडणुका याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आरक्षणाच्या पेचामुळे दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. तर अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा (ZP Elections 2025) धुरळा उडणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची संभाव्य तारीख समोर आली आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका महिनाअखेरला (Expected date for ZP and Panchayat Samiti elections 2025) जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra local body elections 32 ZP ELection schedule)

Zilla Parishad Election date update:
BMC Election : महापालिकेआधी ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी, एकाचवेळी ४०० जणांनी घेतली मशाल

८ दिवसांत झेडपीचा धुरळा उडणार -

नगरपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? याबाबतचा संभ्रम कायम आहे. या चर्चा सुरू असतानाच आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या चार ते आठ दिवसांत लागतील असा दावा केलाय. याआधीही त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखा अचूक सांगितल्या होत्या. दिलीप वळसे पाटील मंचर येथील शेवाळवाडी येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संभाव्य तारखा सांगितल्या.

Zilla Parishad Election date update:
Sangli : निवडणुकीत भाजपच्या अख्ख्या पॅनेलचे डिपॉझिटच जप्त, आता पक्षातच आरोप-प्रत्यारोप, या नेत्यावर टाकली पराभवाची जबाबदारी

जिल्हा परिषदेच्या संभाव्य तारखा काय ?

राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी डिसेंबरच्या अखेरीस आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसोबतच राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडू शकतो. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस अथवा सोमवारी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर २ दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. २८ ते २९ जानेवारी रोजी मतदान अन् निकाल जाहीर होऊ शकतात. ३१ जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.

Zilla Parishad Election date update:
Namo Bharat Video : धावत्या नमो भारत एक्स्प्रेसमध्ये कपलने ठेवले शरीरसंबंध, १ मिनिटाच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com