कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, अनेक भागातील पाणी पुरवठा बंद, रस्ते अन् शाळाही बंद

Traffic Chaos & Water Disruption in Kalyan: कल्याण पश्चिमेत केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटली. याचा थेट पाणीपुरवठ्यावर परिणाम. यामुळे नामांकित के.सी. गांधी शाळाही तीन दिवसांसाठी बंद.
Traffic Chaos & Water Disruption in Kalyan
Traffic Chaos & Water Disruption in KalyanSaam
Published On
Summary
  • कल्याणात जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीचा रस्ता बंद,

  • नामांकित शाळा सलग 3 दिवस बंद ठेवण्याची वेळ

  • विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय परिणाम

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पश्चिमच्या बैलबाजार परिसरातील केडीएमसीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी फुटली. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, दुसरीकडे या कारणामुळे या परिसरातील नामांकित के.सी. गांधी शाळाही सलग तीन दिवस बंद ठेवावी लागली आहे. याचा थेट परिणाम हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे. परिणामी वाहतूक पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी के.सी. गांधी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी दुपारच्या सुमारास फुटली. त्यामुळे संपूर्ण कल्याण पश्चिमेममध्ये पाणीबाणी निर्माण झालीय. तर या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बैल बाजार ते गुरुदेव हॉटेलकडे येणारा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.

हा रस्ता बंद ठेवल्यामुळे आधीच नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे या कल्याणातील सर्वात मोठ्या आणि नामांकित के. सी.गांधी शाळेलाही त्याचा फटाका बसला आहे. बैलबाजार येथे ज्याठिकाणी या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्याच मुख्य मार्गावर के.सी. गांधी शाळा असून त्यामध्ये सुमारे 3 हजार विद्यार्थी आजमितीस शिकत आहेत.

Traffic Chaos & Water Disruption in Kalyan
काँग्रेसला मोठा झटका, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

हा रस्ता एका बाजूने बंद करण्यात आल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसची वाहतूकही ठप्प झाली आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय पाहता गेल्या बुधवारपासून आजपर्यंत शाळा बंद ठेवण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली आहे.

Traffic Chaos & Water Disruption in Kalyan
घरी कुणीही नव्हतं; नराधम आजोबाची नियत फिरली, नातीसोबत केलं असं काही की.., महाराष्ट्र हादरलं

ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तर मोठा परिणाम होतच आहे. त्याशिवाय सध्या परीक्षेच्या हंगामासोबत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र सलग 3 दिवस शाळा बंद ठेवावी लागल्याने या उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवर परिणाम होत असल्याची माहिती शाळेच्या संचालिका स्वप्नाली रानडे यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांवर होणारे हे परिणाम पाहता संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता सुरू करावा किंवा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान यासंदर्भात केडीएसमी पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी पहाटे पूर्ण झाले असून आज दुपार नंतर त्यावरून वाहतूक सुरू केली जाईल अशी माहिती कार्यकारी अभियंता महेश डावरे यांच्याकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com