Pune Crime News  Saam Tv News
मुंबई/पुणे

Satish Wagh Case: आमदाराच्या मामाला कारमध्ये कोंबलं, तिथंच हत्या करून घाटात फेकलं, ४०० CCTV तपासले अन् छडा लागला!

Pune Crime News: ५ लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

विधानपरिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (५५ वर्षे) यांच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्या या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आतमध्ये घडल्याचे तपासातून उघड झाले आहे. अपहरण केल्यानंतर १० ते १५ मिनिटांत अपहरणकर्त्यांनी सतीश वाघ यांची कारमध्ये हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह सिंदवणे घाटात टाकून आरोपींनी पळ काढला होता.

५ लाखांची सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यात आली. सतीश वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून ही हत्या खाजगी आणि वैयक्तिक कारणातून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.अवघ्या ३६ तासांच्या आता पोलिसांनी या गुन्ह्यांचा छडा लावत ३ जणांना अटक केली आहे. उर्वरीत दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

सतीश वाघ यांची हत्या खंडणीसाठी करण्यात आलेली नाही. त्याची हत्या अन्य कारणातून सुपारी देऊन केल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. सतीश वाघ यांचे मॉर्निंग वॉकच्या वेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी कारमधून आलेल्या चौघांनी अपहरण केले होते. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघने (२७ वर्षे) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वाघ यांच्या अपहरणाची बातमी मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.

सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर १० ते १५ मिनिटांतच आरोपींनी कारमध्ये त्यांची हत्या हत्या केली. वाघ यांच्यावर चाकूने वार करत आणि लाकडी दांडक्याने मारहाण करत त्यांची हत्या केली. त्यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी त्यांना सिंदवणे घाटातील निर्जनस्थळी टाकून पळ काढला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना मिळून आला. त्यांनी याबाबत उरुळीकांचन पोलिसांना माहिती दिली होती.

आरोपींनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर काही मिनिटांत त्यांची कारमध्ये हत्या केला. पोलिसांना अपहरणाची माहिती मिळताच, वाघ यांच्या सुटकेसाठी पोलिसांनी काही वेळात तब्बल ४०० ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. अपहरण करण्यासाठी वापरलेल्या कारशी साधर्म्य असलेल्या ५०० कार तपासल्या. अपहरणकर्त्यांचा माग आम्हाला मिळाला होता. त्यानुसार तपासाला गती देण्यात आली. सर्व शक्यता गृहीत धरून आमचा तपास सुरू होता. कारमध्येच वाघ यांची हत्या करण्यात आली होती त्यामुळे याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाईचा कोणताही प्रश्न नाही.

पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सक्षम असून अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिस तत्परतेने काम करतात. दरम्यान या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने २ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. इतर आरोपींसह मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू आहे. ५ लाखांची सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली याची स्पष्टता अजून झाली नाही, अशीही माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT