Beed Crime : सरपंचाच्या हत्येनं बीड हादरले, आधी अपहरण केलं अन् मग जीव घेतला

Beed Murder: अपहरण झालेल्या सरपंचचा मृतदेह आढळल्याने मस्साजोग गावामध्ये तणाव निर्माण झालाय. सरपंच देशमुख खून प्रकरणात पवनचक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Beed Crime : सरपंचाच्या हत्येनं बीड हादरले, आधी अपहरण केलं अन् मग जीव घेतला
Beed Crime : सरपंचाच्या हत्येनं बीड हादरले, आधी अपहरण केलं अन् मग जीव घेतलाBeed Crime : सरपंचाच्या हत्येनं बीड हादरले, आधी अपहरण केलं अन् मग जीव घेतला
Published On

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

Beed Murder Update : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यानंतर हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात पवनचक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. तर या घटनेने मस्साजोग गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून तोडफोड केली. त्यानंतर संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात आज दुपारनंतर दाखल करण्यात आली होती.

Beed Crime : सरपंचाच्या हत्येनं बीड हादरले, आधी अपहरण केलं अन् मग जीव घेतला
Shrirampur Crime : चोरी करायला गेला अन् पोलीस आले; इमारतीवरून उडी मारण्याची पोलिसांना धमकी, चोरट्यास घेतले ताब्यात

मात्र काही तासानंतर बोरगाव- दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावाकरी आक्रमक झाले आहेत.. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली जात आहे.

Beed Crime : सरपंचाच्या हत्येनं बीड हादरले, आधी अपहरण केलं अन् मग जीव घेतला
Ambernath Crime: पार्टीच्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या; अंबरनाथमधील धक्कादायक घटना

पवनचक्कीच्या वादातून खून, खासदाराचा आरोप -

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. तर हा खून मस्साजोग येथील पवनचक्कीच्या वादातून आणि खंडणीच्या वादातून झाला आहे. याविषयी मी पोलीस अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना फोन केला, मात्र ते देखील माझा फोन उचलत नाहीत. असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे..

मी अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला, पोलीस अधीक्षकांना फोन केला, मात्र ते माझा फोन घेत नाहीत..जे कोणी दोषी आहेत, त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. कॉल ट्रेस करून आरोपींवर कारवाई करा. राजकारणाची प्रवृत्ती याच्या पाठीमागे आहे..कोणी सत्तेत येत असेल आणि ते खून करत असतील, तर ती बाब अत्यंत निंदणीय आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.

बीड - सरपंच खून प्रकरण, बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून काल खून करण्यात आला आहे. याप्रकरणी आता मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी बीड- अंबाजोगाई महामार्ग अडवत मस्साजोग येथे रास्ता रोको केला आहे. दरम्यान यामुळे बीड-अंबाजोगाई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com