Nagpur Crime: धक्कादायक! ड्यूटीवर असताना स्वतःवर झाडली गोळी, नागपूरमध्ये जवानाच्या आत्महत्येने खळबळ

Nagpur Crime: नागपूरमध्ये ड्युटीवर कार्यरत असतानाच जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
Nagpur
Nagpur
Published On

नागपूरमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. नागपुरातील वायुसेना नगर येथे जवानाने स्वतःच्या रायफलने गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. मध्यरात्री ड्युटीवर कार्यरत असतानाच त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहे.

या आत्महत्या मागे अजून काय कारण होतं हे स्पष्ट झालेले नाही. जयवीर सिंग असं या जवानाचं नाव आहे. संबंधित हा जवान नागपूरातील वायुसेना पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तसेच या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

Nagpur
Jalna Crime: जालन्यामध्ये टोलनाक्यावर ट्रक चालकावर गोळीबार, घटनेचा थरारक CCTV समोर

आम्ही पो. उपनि.राहुल पो. ठाणे. गिट्टीखदान नागपूर शहर आज दि. १० डिसेंबर रोजीचे २२.०० ते दि. ११ डिसेंबर चे १०.०० पर्यंत पो.ठाणे ला रात्रपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना २.१५ वाजताचे सुमारास पोलीस ठाण्याला फोनद्वारे माहिती मिळाली की, वायुसेना मुख्यालय गार्ड पोस्ट अल्फा नं. ८ वर ड्यूटी वर असलेले जैविरसिंग यांनी आपल्या सर्विस रायफलने कपाळावर गोळी मारुन आत्महत्या केली आहे. सदर माहिती पोनि गुन्हे यांना देवून सदरचे घटनास्थळी पोलीस स्टाफसह नोंद क्र. ७ वेळ २.२९ प्रमाणे सि.आर. गाडीने रवाना झाले.

Nagpur
Kurla Accident: क्लच समजून चुकून 'एक्सिलेटर' दाबला, अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं? आरोपी चालकानं सर्वकाही सांगितलं...

वायुसेना मुख्यालय गार्ड पोस्टचे दुसऱ्या माळ्यावर वायुसेना शासकिय गणवेश प्रधान केलेल्या स्थितीत जैविरसिंग हा जखमी अवस्थेत प्लॅस्टिक खुर्चीवर बसलेल्या स्थितीत दिसून आला. त्याची शासकिय रायफल ए.के. १०३ विना मॅग्झीनची त्याचे दोन्ही पायाच्या मधे दिसून आली. जैविरसिंग याच्या कपाळाच्या आणि डोक्याच्या मागे गंभीर जखम झालेले असून रक्तस्त्राव होताना दिसून आले. घटनास्थळी वायुसेनाचे वरिष्ठ अधिकारी आणि वायुसेनाचे शासकीय डॉ. राकेश हे तेथे हजर असून जैविरसिंग यांस तपासून मृत घोषित केले असे पोलीस अधिकारी म्हणाले.

Nagpur
Rohingya in Pune: रोहिंग्यानं पुण्यात थाटला संसार, बांगलादेशमधून पश्चिम बंगालमार्गे भारतात एन्ट्री; काय आहे प्रकरण?

तसेच दोन दिवसांपूर्वीही मुरबाडमध्येही एक घटना घडली. मुरबाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नामदेव चारस्कर यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारस्कर यांनी कामावर असताना हे टोकाचे पाऊल उचललं.

पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीच्या इमारतीत ते राहत होते. या इमारतीच्या गच्चीवरून त्यांनी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्या मागचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com