Kurla Accident: क्लच समजून चुकून 'एक्सिलेटर' दाबला, अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं? आरोपी चालकानं सर्वकाही सांगितलं...

Kurla best bus accident: कुर्ला बेस्ट बस अपघातात ४९ नागरिक गंभीर स्वरुपात जखमी झाले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता आरोपीला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Kurla BEST Bus Accident
Kurla BEST Bus Accident
Published On

मुंबईतील कुर्ला येथे काल रात्री खूप मोठा अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहेत. मुंबई दुर्घटनेच्या कारणाचा तपास सुरू असून संजय मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय मोरेला 11 दिवसांची पोलीस कोठडीही सुनवण्यात आली. सोमवारी म्हणजेच काल रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.

बेस्टची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे मार्ग क्रमांक ३३२ वरून जात असल्याचे सांगण्यात आले. या बेस्ट बसेस बृहन्मुंबई महानगरपालिका चालवतात. एल वॉर्ड कार्यालयाजवळील व्हाईट हाऊस इमारतीजवळ बसचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगात आलेल्या बसने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात पाच-सहा ऑटोरिक्षा, १० मोटारसायकल आणि सुमारे १० पादचाऱ्यांचा समावेश आहे. बसचालक संजय मोरे (५४) याला अटक करण्यात आली आहे.

Kurla BEST Bus Accident
Jalna Crime: जालन्यामध्ये टोलनाक्यावर ट्रक चालकावर गोळीबार, घटनेचा थरारक CCTV समोर

ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने गोंधळल्याचे संजय मोरे यांनी पोलीस चौकशीत स्पष्ट केले आहे. क्लच नसलेल्या गाड्या चालवणं गैरसोईच असल्याचा संजय मोरेंनी पोलिसांना जबाब दिला. गाडी चालवताना क्लच समजून एक्सिलेटर दाबल्याचे बसचालक संजय मोरे यांनी संकेत दिले. ४३ वर्षीय चालकाला अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. १ डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Kurla BEST Bus Accident
Ladki Bahin Yojana: धुळ्यातील २१२४९ महिलांना पैसे आलेच नाहीत, ५ लाख लाडक्या बहि‍णींना मिळाला लाभ!

संजयविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत त्याने बसच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबाबत संभ्रम असल्याची कबुली दिली. कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Kurla BEST Bus Accident
Viral Video: दिलजीत दोसांझच्या बंगलोर कॉन्सर्टनंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदा दिसली लेकीसोबत, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com