Jalna Crime: जालन्यामध्ये टोलनाक्यावर ट्रक चालकावर गोळीबार, घटनेचा थरारक CCTV समोर

Jalna Crime: मुंबईतील राहणारा मोहम्मद रिजवान असामुद्दिन हा ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालन्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Jalna Crime
Jalna Crime
Published On

जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील चंदनझिरा परिसरात असलेल्या टोलनाका येथे कारमधून आलेल्या अज्ञात आरोपीकडून ट्रक चालकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या गोळीबारामध्ये मुंबई येथील राहणारा मोहम्मद रिजवान असामुद्दिन याच्या कंबरेला गोळी लागली गेल्याने तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी यांनी भेट दिली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

Jalna Crime
Ladki Bahin Yojana: धुळ्यातील २१२४९ महिलांना पैसे आलेच नाहीत, ५ लाख लाडक्या बहि‍णींना मिळाला लाभ!

जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्याजवळ काल रात्री ट्रक चालकावर चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला होता. यात मुंबईतील राहणारा मोहम्मद रिजवान असामुद्दिन हा ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालन्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान जखमीच्या फिर्यादीवरून जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime
Pandharpur: पंढरपुरात विठुरायाचा गजर! कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरमध्ये वारकरी भक्तांची मांदियाळी

हल्लेखोर आणि जखमी दोघेही मुंबईचे

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक आणि त्याच्यावर हल्ला करणारे दोघेही मुंबईचे रहिवासी आहे. ट्रक चालक जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्याजवळ एका हॉटेलवर चहापाणीसाठी थांबला असता पाठीमागून येणाऱ्या चार चाकी गाडीतून उतरून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान जखमी आणि त्याच्यावर गोळीबार करणारे दोघेही मुंबईचे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Jalna Crime
Ladki Bahin Yojana: धुळ्यातील २१२४९ महिलांना पैसे आलेच नाहीत, ५ लाख लाडक्या बहि‍णींना मिळाला लाभ!

जुन्या वादातून गोळीबार

जालन्यात काल रात्री गोळीबार झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र गोळीबार करणारा आणि ज्याच्यावर गोळीबार झाला तो दोघेही मुंबईचे राहणारे आहे. दरम्यान जुन्या आर्थिक वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांना आहे .याप्रकरणी जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Akshay Shinde

Jalna Crime
Tamil Nadu Scientist Cheated : राज्यपाल करतो, ५ कोटी घेतले; नाशिकच्या भामट्याने शास्त्रज्ञाला लावला चुना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com