Pune Crime: भिक्षूच्या वेशातल्या चोराला स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या; जैन मंदिरातून चोरल्या होत्या ४ लाखांच्या मूर्ती

Pune Police Arrested Thief: चोरट्याने एकाच दिवशी तीन ते चार जैन मंदिरात चोरीचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
Pune Police
Pune Police Arrested ThiefSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी

जैन मंदिरातील सोन्याचे दागिने आणि देवाच्या सोन्याच्या मूर्ती चोरणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपी जैन साधकाच्या वेशात जाऊन जैन मंदिरातील मौल्यवान सोन्याचे दागिने आणि मूर्तींची चोरी करत होता. ⁠⁠नरेश आगरचंद जैन असे १९ वर्षीय आरोपीचे नाव आहे. जैन भिक्षूचे वेश करत जैन मंदिरांना लक्ष्य करणारा चोर नरेश अग्रचंद जैनला स्वारगेट पोलिसांनी अटक केलीय. नरेश हा मुंबईतील गिरगावमधील बॉम्बे चाळीत राहणारा आहे.

निलेश जैनने सिटीवुड सोसायटी, पूनावाला गार्डनमधील जय पारेख यांच्या गृहमंदिरातील सोन्याचे मुकूट,साखळीची चोरी केली होती. पोलिसांनी याप्ररकरणी माहिती दिली. चोरट्याने एकाच दिवशी तीन ते चार जैन मंदिरांतून कार्तिक पौर्णिमा उत्सवाचा गैरफायदा घेऊन चोरीचा प्रयत्न केला होता. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त जैन मंदिरामध्ये समारंभ पूर्वक पूजा-अर्चा केली जाते. त्यावेळी लक्ष ठेवून आरोपीने जय पारिख यांच्या सॅलिसबरी पार्क येथील घरातील जैन मंदिरात चोरी केली.

Pune Police
kalyan Crime : मित्रानेच केला मित्राचा घात, पैशांसाठी तोतया पोलीस बोलावून उकळले लाख रुपये

त्याचबरोबर इतर चार ठिकाणी देखील त्याने अशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी केल्यानंतर आरोपी फरार होता त्याला स्वारगेट पोलिसांनी मुंबईतून अटक केली गेली. वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस या चोरी प्रकरणाचा तपास केला गेला. नांद्रे यांच्या तपासासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी निलेश जैनचा माग काढत तो मुंबईतील गिरगाव येथील राहणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेत तेथून तब्बल ₹420,000 किमतीच्या चोरीच्या वस्तू जप्त केल्या.

Pune Police
Pune Crime: कॉलेजला जायला घराबाहेर पडला, परत आलाच नाही; तरुणासोबत घडलं भयंकर

आरोपीने मुंबईतील काही प्रसिद्ध सराफ व्यवसायिकांना चोरीचं सोनं आणि सोन्याच्या देवाच्या मूर्ती विकल्या होत्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर जैनने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वी घाटकोपर,वाई, चिखली आणि डोंबिवली येथील मंदिरांना लक्ष्य केले होते.

चोराला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाचं नेतृत्व वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे यांनी केलं होतं. त्यांच्या पथकात पोलीस निरीक्षक तानावडे, तसेच पोलीस हवालदार दिनेश भांदुर्गे, शंकर संपते, सागर केकाण, रफीक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सतीश कुंभार, पोलीस मित्र दिनेश परिहार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com