पुणे महानगरपालिकेकडून गुरुवारी पाणीपुरवठा बंदची घोषणा
पुणे शहरात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
पर्वती, कोथरूड, बाणेर, कात्रज भागात पाणीपुरवठा बंद
पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे शहरातील अनेक प्रमुख भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा अतिवापर टाळावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन पुणे महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे.
पुणे शहरातील मध्यवर्ती पेठा आणि नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याच्या (सिंहगड रस्ता) भागात नियमित पाणीपुरवठा होईल. बुधवारी रात्री १२ ते गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमधील पाणी पुरवठा बंद राहिल. पेठा, सिंहगड रस्त्यावरील पाणीपुरवठा मात्र सुरळीत राहिल, असे पालिकेने सांगितले.
पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, चिंतामणीनगर, गंगाधाम, अप्पर व लोअर इंदिरानगर, लेकटाउन, डायस प्लॉट सॅलिसबरी पार्क, पर्वती गावठाण, जनता वसाहत व लगतचा परिसर.
भामा आसखेड लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व संलग्न परिसर.
संपूर्ण बावधन, भुसारी कॉलनी, पौड रस्ता, पौड फाटा, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, विठ्ठल मंदिर, सहवास, गोसावी वस्ती, करिश्मा परिसर, नळस्टॉप ते दशभुजा गणपती, मंगेशकर रुग्णालय परिसर, महात्मा सोसायटी, वारजे माळवाडी, तपोधाम, काकडे सिटी, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, कॅनॉल रस्ता.
बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, सूस रोड, भूगाव, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, गणराज चौक, पॅनकार्ड क्लब परिसर.
गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता व परिसर, खडकी, सकाळनगर
संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक व खुर्द, वंडर सिटी, बालाजीनगर, सुखसागरनगर भाग १ व २, कात्रज गावठाण, येवलेवाडी.
खडकी कँटोन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएस, हरिगंगा सोसायटी.
वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे धावडे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.