Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

Pune Water Dam Storage News : पुण्यात धरणक्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत दिलासादायक स्थिती आहे.
PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEF
PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEFSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात १३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

  • धरणक्षेत्रातील पावसाचा जोर कमी

  • खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात

  • धरण साखळीत ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध

राज्यात पावसाचा जोर वाढला असून आज १३ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात प्रशासनाने कपात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. मात्र, पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे आता विसर्ग कमी करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे ६ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आता पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आल्याने नदीपात्रातील पाणीही हळूहळू नियंत्रणात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEF
Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

दरम्यान, खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. साखळीतील एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला असून आगामी काळातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

PUNE DAM WATER STORAGE REACHES 82.86% | KHADAKWASLA FULL | WATER SUPPLY RELIEF
Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

सद्यस्थितीनुसार खडकवासला धरणात ९५.५१ टक्के, टेमघर धरणात ८७ टक्के, वरसगाव धरणात ९७ टक्के, तर पानशेत धरणात ९८ टक्के पाणीसाठा आहे. धरणांतील मुबलक साठ्यामुळे पुणे शहर आणि परिसराच्या पाणीपुरवठ्याबाबत सध्या कोणतीही चिंता नसल्याचे चित्र आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जलसंपदा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. आवश्यकतेनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com