ईद सणानिमित्त उद्या, बुधवारी (दि. २६ ऑगस्ट २०२६) पुणे शहरातील नानापेठ परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य भागांतील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पोलीस वाहतूक शाखेकडून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. तसेच मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
असा असेल मिरवणुकीचा मार्ग
सकाळी मिरवणुकीस नानापेठेतील मनुशाह मस्जिद येथून सुरुवात होईल. त्यानंतर संत कबीर चौक, ए.डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी चौक, निशांत सिनेमा, भगवानदास चाळ, चुडामन तालीम, मुफ्ती फौज चौक, सरदार पटेल रोड, कुरेशी मस्जिद, जान मोहम्मद स्ट्रीट, बाबाजान दर्गाह, चारबावडी चौकी, फुलवाला गल्ली, सेंटर स्ट्रीट रोड, भोपळे चौक, १५ ऑगस्ट चौक, एम.जी. रोड, महमद रफी चौक, कोहीनूर चौक, महावीर चौक, सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी चौक, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना सिनेमा, हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक आणि सुभानशाह दर्गा चौक मार्गे ही मिरवणूक शुक्रवार पेठेतील सिटी जामा मस्जिद येथे पोहोचून तिची सांगता होईल.
मिरवणूक मार्गावर १०० मीटर अंतरापर्यंत नो-पार्किंग
मिरवणुकीचा मुख्य मार्ग तसेच या मार्गाला जोडणाऱ्या उप-रस्त्यांच्या तोंडापासून आत १०० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडल्यास गाड्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
वळवण्यात आलेले महत्त्वाचे पर्यायी मार्ग:
रास्ता पेठ ते संत कबीर चौक: ही वाहतूक समर्थ पोलीस स्टेशन आणि क्वार्टर गेट मार्गे वळवण्यात येईल.
नाना पेठ ते लक्ष्मी रोड: या मार्गावरील वाहने नाना चावडी चौकातून रास्ता पेठ-पॉवर हाऊस मार्गे सोडली जातील.
कॅम्प आणि एम.जी. रोड परिसर: वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक बंद करून खाणे मारुती चौकाकडे वळवली जाईल.
इस्कॉन मंदिर ते अरोरा टॉवर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणारी वाहतूक सकाळी ९ वाजल्यापासून परिस्थितीनुसार बंद करून पर्यायी मार्गाने सोडली जाईल.
व्होल्गा चौक ते महमद रफी चौक: ही वाहतूक बंद करून ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येईल.
मिरवणूक जशी पुढे सरकेल तसे स्थानिक परिस्थितीनुसार वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल केले जातील. त्यामुळे वाहनचालकांनी मुख्य मार्गांऐवजी पोलिसांच्या सूचनेनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.