पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Pune MHADA Lottery : पुण्यात म्हाडाच्या ४४६२ घरांची लॉटरी जाहीर; १३ लाखांपासून घरे उपलब्ध. अर्जाची अंतिम मुदत, निकालाची तारीख, लोकेशन, पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.
Pune MHADA lottery 2026 4462 flats application date
Pune MHADA lottery 2026 4462 flats application dateSaam TV marathi
Published On

Pune MHADA lottery 2026 4462 flats application date : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) तब्बल ४ हजार ४६२ घरांसाठी भव्य सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठीची अधिकृत अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरूवात झाली. १३ ऑक्टोबर रोजी या सोडतीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या घराच्या किंमती १३ लाखांपासून सुरु होत असल्याची माहिती आहे.

या लॉटरीमध्ये पुणे महानगरपालिका हद्दीतील १४६८ सदनिका, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील १४०६ सदनिका आणि पीएमआरडीए (PMRDA) हद्दीतील १५८८ अशा एकूण ४४६२ परवडणाऱ्या घरांचा समावेश आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून, १६ सप्टेंबरपर्यंत बँकेत अनामत रक्कम जमा करता येणार आहे. २९ सप्टेंबरला पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाईल, तर १ ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी अंतिम स्वीकृत अर्जांची यादी जाहीर होईल. त्यामुळे पुण्यासह लगतच्या परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचे लक्ष आता या म्हाडा सोडतीकडे लागले आहे.

Pune MHADA lottery 2026 4462 flats application date
भाजप आमदाराच्या मुलीनं महिला PSI च्या कानशिलात लगावली, मंदिरात हायव्होल्टेज ड्रामा; व्हिडीओ व्हायरल
  • म्हाडाची ४४६२ घरांसाठी लॉटरी

  • अर्ज प्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात

  • पुणे महापालिका क्षेत्रात १४६८ सदनिका

  • पिंपरी-चिंचवड क्षेत्रात १४०६ सदनिका

  • पीएमआरडीए हद्दीत १५८८ सदनिका उपलब्ध

  • अर्ज प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची मुदत - १५ सप्टेंबर

  • सोडतीचा निकाल - १३ ऑक्टोबर रोजी

  • अनामत रक्कम बँकेत जमा करण्याची मुदत - १६ सप्टेंबर

  • अर्जाची प्रारूप यादी - २९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार

  • एक ऑक्टोबरपर्यंत दावे, हरकती दाखल करता येतील

  • स्वीकृत अर्जाची अंतिम यादी - ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

Pune MHADA lottery 2026 4462 flats application date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

कुठे कुठे घरं उपलब्ध?

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये घरं उपलब्ध आहेत. सामाजिक गृहनिर्माण योजनेत मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव येथील सदनिकांचा समावेश आहे. तर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, मुंढवा, बावधन आणि कोंढवा खुर्दसह विविध भागांतील घरांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव अशा परिसरांमध्येही सदनिका उपलब्ध आहेत. EWS गटासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत, तर LIG गटासाठी ९ लाख रुपयांपर्यंत असणं आवश्यक आहे. उत्पन्नाचा पुरावा १ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीशी संबंधित असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com