भाजप आमदाराच्या मुलीनं महिला PSI च्या कानशिलात लगावली, मंदिरात हायव्होल्टेज ड्रामा; व्हिडीओ व्हायरल

BJP MLA’s Daughter Slaps Woman PSI at Temple : कर्नाटकातील श्रीरंगपट्टणच्या मंदिरात भाजप आमदाराच्या मुलीचा महिला PSI सोबत वाद झाला. ऐश्वर्या गौडा यांनी महिला पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा दावा असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Karnatak Mla Daugter Slap Women Police
Karnatak Mla Daugter Slap Women Police
Published On

Karnatak Mla Daugter Slap Women Police : भाजप आमदाराच्या मुलीनं कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या (PSI) थेट कानशि‍लात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप मुलीची दादागिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाण्यावरून झालेल्या वादानंतर आमदाराच्या मुलीने कायदा आणि पोलिसांना बाजूला सारत थेट महिला पोलिसावरच हात उगारल्याने संपूर्ण कर्नाटकात संतापाची लाट पसरली आहे.

कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील प्रसिद्ध उक्कड मंदिरात हा सर्व हायव्होल्टेज ड्रामा घडला. मारहाण करणारी तरुणी ही भाजपचे स्थानिक आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या गौडा असल्याचे समोर आले. मंदिरातील ठराविक नियमांनुसार महिला पोलिसांनी तिला गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले होते. याच रागातून ऐश्वर्या गौडा हिने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालत तिच्या कानशिलात वाजवली.

Karnatak Mla Daugter Slap Women Police
भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

या घटनेनंतर मंदिर परिसरात प्रचंड गदारोळ झाला. कायद्याचा धाक उरला नसलेल्या आमदाराच्या मुलीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणात पीएसआयने ऐश्वर्या गौडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू झाला आहे. ऐश्वर्या गौडा यांनीही महिला पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Karnatak Mla Daugter Slap Women Police
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

श्रीरंगपट्टण येथील एका मंदिरात पोलीस उपनिरीक्षक आणि आमदाराच्या मुलीमध्ये झालेल्या झटापटीचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे .

फुटेजमध्ये भाजप आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या मंदिरात पीएसआय सविता पाटील यांच्यासोबत जोरदार वाद घालताना दिसत आहे. हा वाद सुरू असताना, ती अधिकाऱ्याला कानशिलात मारते. त्यावर PSI कडूनही प्रत्युत्तर दिल्याचे दिसतेय. परिस्थिती शांत करण्यासाठी घटनास्थळी असलेले इतर लोक पुढे येतात. ही घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजता, मंदिरात भीम अमावस्येच्या उत्सवादरम्यान घडली.

Karnatak Mla Daugter Slap Women Police
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचे मोठे पाऊल; २९ ऑगस्टला मुंबईत निर्णय

मंड्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) सविता पाटील यांनी या घटनेसंदर्भात नंतर 'क्याथनहळ्ळी' पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला ही तक्रार स्वीकारली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या ही दर्शनासाठी मंदिरात आली होती. तिला लगेच आत सोडण्यास पोलिसांनी नकार दिल्याने तिने यावर तीव्र आक्षेप घेतला. तक्रारीनुसार, तिने महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करत तिच्या कानशिलात लगावली आणि शासकीय कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केला.

Karnatak Mla Daugter Slap Women Police
Crime : घराला कुलूप लावून बाहेर पडताय? सावधान! मुंबईतील 'या' चोराची मोडस ऑपरेंडी ऐकून चक्रावून जाल

दरम्यान, आमदार बी. सुरेश गौडा यांनी या घटनेबाबत जाहीर माफी मागितली आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यानेच आधी आपल्या मुलीला शिवीगाळ केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

"माझी मुलगी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिने मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची विनंती केली होती. परंतु, पोलिसांनी तिला आत सोडण्यास नकार दिला आणि एका सर्कल इन्स्पेक्टरला मात्र आत जाऊ दिले. माझ्या मुलीने पुन्हा त्यांना आत सोडण्याची विनंती केली. त्यावेळी त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने माझ्या मुलीला शिवीगाळ केली, असे समजते. त्यातूनच पुढे वादावादी आणि मारामारी सुरू झाली. माझ्या मुलीने त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात मारल्याचा व्हिडिओ मी अजून पाहिलेला नाही. तरीही मी या घटनेबद्दल माफी मागतो, मला याबद्दल वाईट वाटते," असे आमदार गौडा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com