Salt Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये मीठ कोणत्या दिशेला ठेवलंय? वास्तूशास्त्रात सांगितलीये योग्य दिशा

Salt Placement in Kitchen: वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये मीठ कोणत्या दिशेला ठेवावं? मिठाचा डबा स्टीलमध्ये ठेवणं अशुभ का मानलं जातं? घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-समृद्धीसाठी मिठाचे कोणते उपाय करावेत? जाणून घ्या मिठाशी संबंधित महत्त्वाचे वास्तु नियम आणि टाळावयाच्या चुका.
Salt Vastu Tips
Salt Vastu Tipssaam tv
Published On: 

वास्तुशास्त्रानुसार, घरातील किचन हे सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. किचनमध्ये कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, याचाही घरावर परिणाम होत असल्याचं मानलं जातं. स्वयंपाकघरातील वस्तू योग्य जागी ठेवल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. पण किचनमधील एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर होऊ शकतो, असंही म्हटलं जातं.

अशाच महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे मीठ. रोजच्या स्वयंपाकात वापरलं जाणारं मीठ केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर वास्तुशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, मिठाचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी आहे. त्यामुळे किचनमध्ये मीठ योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवणं शुभ मानलं जातं. मग वास्तुशास्त्रानुसार मीठ नेमकं कुठे ठेवावं? त्याचप्रमाणे ते ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घेऊया.

Salt Vastu Tips
Kitchen Vastu Tips: किचनमध्ये फ्रीज आणि झाडू कुठे ठेवताय? योग्य दिशा माहितीये का? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

किचनमध्ये कोणत्या दिशेला ठेवावं मीठ?

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये मीठ ठेवण्यासाठी पश्चिम दिशा चांगली मानली जाते. या दिशेला मीठ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि सुख-समृद्धी येते असं मानलं जातं. याशिवाय मीठ ठेवण्याची जागा स्वच्छ आणि कोरडी असावी. मीठ नेहमी काचेच्या किंवा सिरॅमिकच्या स्वच्छ डब्यात ठेवण्याचा सल्ला दिला जातो

मीठ कधीही स्टीलच्या डब्यात ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. कारण स्टील आणि लोखंडाचा संबंध शनिच्या धातूशी जोडला जातो. त्यामुळे या धातूंच्या डब्यात मीठ ठेवणं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही.

मीठ ठेवताना 'या' चुका करू नका

किचनमध्ये मीठ ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, पुढील चुका टाळाव्यात.

मीठ उघडं ठेवू नका

मीठ नेहमी झाकण असलेल्या डब्यात ठेवावं. ते उघडं ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, असं मानलं जातं.

स्टील किंवा लोखंडाचा डबा वापरू नका

मिठासाठी काचेचा किंवा सिरॅमिकचा डबा वापरणं शुभ मानलं जातं.

Salt Vastu Tips
Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

अस्वच्छ ठिकाणी मीठ ठेवू नका

मिठाचा डबा कचऱ्याच्या डब्याजवळ किंवा ओलावा आणि घाण असलेल्या जागी ठेवणं टाळावं.

ओला चमचा वापरू नका

मीठ काढण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करावा. त्यामुळे मिठात ओलावा किंवा घाण जाण्याची शक्यता कमी होते.

इतर मसाल्यांसोबत मीठ ठेवू नका

किचनमध्ये मीठ इतर मसाल्यांच्या डब्यांसोबत ठेवू नये. असं केल्याने ग्रह कमजोर होतात, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

मिठाशी संबंधित वास्तु उपाय कोणते?

वास्तुशास्त्रानुसार, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी मिठाचे काही उपाय सांगितले आहेत. यासाठी एका काचेच्या वाटीत खडे मीठ घेऊन ती वाटी घरातील किचनमध्ये ठेवावी. हे मीठ ठराविक काळाने बदलत राहावं. त्याचप्रमाणे घरात फरशी पुसताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकण्याचाही सल्ला दिला जातो. या उपायांमुळे घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

Salt Vastu Tips
Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.