Shreya Maskar
येणारा वीकेंड घरी राहण्यापेक्षा बॅग भरा आणि पुणे गाठा. पुणे हे शहर पर्यटनदृष्ट्या खूप विकसित आहे. परदेशी पर्यटक येथे वीकेंडला गर्दी करतात.
पुणे येथील कात्रजजवळील येवलेवाडी भागात गुजरवाडी धबधबा वसलेला आहे. पावसाळ्यात येथे वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप प्लान करा.
स्थानिक डोंगररांगा आणि बोपदेव घाटाच्या जवळ असलेल्या या ठिकाणी पावसाळ्यात निसर्गरम्य दृश्ये आणि फिरण्यासाठी एक छोटी पायवाट उपलब्ध असते.
निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला भन्नाट फोटोशूट करायचे असेल तर गुजरवाडी धबधब्याला नक्की भेट द्या. तसेच येथे इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
पावसाळ्यात येथे हिरवीगार वनराई पाहायला मिळते. तसेच ओल्या चिंब रस्त्यावरून फिरण्याची मजाच काही और आहे. तुम्ही येथे रोड ट्रिप देखील प्लान करू शकता. उंचावरून कोसळणारा धबधबा पाहून तुमचे मन मोहून जाईल.
पुण्यातील इतर पर्यटन स्थळांची यादी नोट करा. उदा. शनिवार वाडा पॅलेस, आगा खान पॅलेस, सिंहगड किल्ला, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर , सारसबाग, पर्वती टेकडी
मुंबई टू पुणे तुम्ही ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा किंवा बसने कात्रजजवळ पोहचा आणि पुढे चालत धबधब्यापर्यंत जाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.