Shreya Maskar
मुंबई आणि पुण्याजवळ असलेले लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजे लोणावळा- खंडाळा होय. येथे टायगर पॉइंट, भुशी डॅम असे अनेक पिकनिक स्पॉट आहेत. पावसाळ्यात येथे गरमागरम भाजलेल्या मक्याचा आनंद घ्या.
माथेरान हे आशियातील एकमेव वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण आहे. येथे गाड्यांवर बंदी असल्याने येथील हवा अत्यंत ताजीतवानी राहते. संपूर्ण जंगल ढगांनी व्यापलेले आहे.
ताम्हिणी घाट हा पुणे आणि कोकण किनारपट्टीला जोडणारा एक सुंदर पर्वतीय मार्ग आहे. रस्त्याच्या कडेला असलेले असंख्य धबधबे, गडद हिरवीगार दरी आणि खाली दाटीवाटीने जमलेले ढग यांमुळे पावसाळ्यातील रोड ट्रिपसाठी हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे.
देवकुंड धबधबा रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ घनदाट जंगलात आहे. मुंबईपासून याचे अंतर सुमारे १३९ किमी आणि पुण्यापासून ११५ किमी आहे. वीकेंडला नक्की ट्रिप प्लान करा.
साताऱ्यातील कास पठार जगात भारी आहे. येथे लाखो लहान रानफुलांचे रंगीबेरंगी गालिचे पाहायला मिळतात. पावसाळ्यात फोटोशूटसाठी हे भन्नाट लोकेशन आहे.
भंडारदरा हे ठिकाण आर्थर तलावाच्या काठावर वसलेले आहे. हा जलाशय भंडारदरा धरणाच्या (विल्सन डॅम) पाण्याने तयार झाला आहे. येथून धरणाचे विस्मयकारक दृश्य दिसते.
माळशेज घाट हा आपल्या वळणदार घाट रस्त्यांसाठी ओळखला जातो. पावसाळ्यात येथे पर्यटक विविध प्रकारचे पक्षी आणि गुलाबी फ्लेमिंगो पाहायला येतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.