Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे देतात फॉरेनचा फील, रिमझिम पावसात मारा फेरफटका

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात धबधब्याखाली भिजणे जणू एक स्वर्ग सुख आहे. तुम्हाला महाराष्ट्रात राहून फॉरेनचा फील घ्यायचा असेल तर या धबधब्यांना नक्की भेट द्या.

Monsoon | pinterest

देवकुंड धबधबा

भिरा येथे देवकुंड धबधबा वसलेला आहे. हा किल्ला त्याच्या पाचूच्या रंगासारख्या निळसर-हिरव्या कुंडामुळे आणि हिरव्यागार जंगलातून जाणाऱ्या आनंददायी ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे.

Devkund Waterfall | pinterest

काळू धबधबा

काळू धबधबा हा माळशेज घाटातील मुख्य आकर्षण आहे. सह्याद्रीतील सर्वात भव्य आणि खोल दरीतून वाहणाऱ्या धबधब्यांपैकी एक म्हणून हा धबधबा ओळखला जातो. धबधबा उंच कडेकपारींनी आणि दाट धुक्याने वेढलेला आहे.

Kalu Waterfall | pinterest

ठोसेघर धबधबा

ठोसेघर धबधबा हा सातारा जवळ वसलेला आहे. हिरव्यागार दरीत टप्प्याटप्प्याने खाली कोसळणाऱ्या धबधब्यांची ही एक भव्य मालिका आहे, ज्यातील सर्वात उंच टप्पा सुमारे ५०० मीटरचा आहे.

Thoseghar Waterfall | pinterest

कुणे धबधबा

लोणावळ्याला गेल्यावर कुणे धबधब्याला नक्की भेट द्या. पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य दरीच्या मधोमध २०० मीटर उंचीवरून खाली कोसळणारा हा तीन टप्प्यांचा अतिशय सुंदर धबधबा आहे.

Kune Waterfall | pinterest

आंबोली धबधबा

सिंधुदुर्गमध्ये आंबोली धबधबा वसलेला आहे. आंबोली हिल स्टेशनचे हे मुख्य आकर्षण आहे. हिरव्यागार जंगलांच्या मधून पांढऱ्या शुभ्र पाण्याचा प्रचंड प्रवाह घेऊन खाली कोसळतो.

Amboli Waterfall | pinterest

वजराई धबधबा

पावसाळ्यात कास पठारचे सौंदर्य खुलून येते. कास पठाराच्या दरीजवळ ५६० मीटरपेक्षा जास्त उंचीवरून खाली कोसळणारा वजराई धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

Vajrai Waterfall | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : धबधबा की निसर्गाचा चमत्कार? पालघरमधील 'या' सुंदर ठिकाणी वीकेंड एन्जॉय करा

Palghar Waterfall | AI PHOTO
येथे क्लिक करा...