Shreya Maskar
पावसाळ्यात मुंबईजवळ वन डे ट्रिप प्लान करायची असेल तर पालघर बेस्ट लोकेशन आहे. येथे काळमांडवी धबधबा आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार शहरापासून दक्षिणेस सुमारे ८ किलोमीटर अंतरावर केलीचा पाडा गावाजवळ काळमांडवी धबधबा वसलेला आहे.
हा धबधबा काळशेट्टी नदीवर असून, १०० मीटर उंचीचा आणि अनेक टप्प्यांतून खाली येणारा धबधबा आहे. विशेष म्हणजे या नदीचा प्रवाह वर्षभर अखंडित राहतो.
पाण्यात मनसोक्त मजा-मस्ती करायची असेल तर तुम्हाला पावसाची वाट पाहायची गरज नाही, हा धबधबा वर्षभर प्रवाहित असतो. त्यामुळे तुम्ही नक्की जा.
येथील तीव्र उतार असलेले खडकाळ कडे आणि आजूबाजूची दरी यामुळे हे ठिकाण ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगचा आनंद घेता येतो.
धबधब्याच्या पायथ्याशी खडकांपासून बनलेला एक नैसर्गिक जलाशय आहे. पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळात येथे थंड पाण्यात डुबकी मारणे किंवा पोहणे पर्यटकांना खूप आवडते.
तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातच भन्नाट फोटोशूट करायचे असेल तर काळमांडवी धबधब्याला नक्की भेट द्या. येथे निसर्गाचा सुंदर धबधबा पाहायला मिळेल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.